सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नोटा अन् उमेदवारात लढत होणार का? निवडणूक आयुक्तांनी सांगितले

सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नोटा अन् उमेदवारात लढत होणार का? निवडणूक आयुक्तांनी सांगितले

सुरत आणि इंदूर लोकसभा निवडणुकी दरम्यान सर्वच उमेदवारांनी माघार घेतले होती. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे त्या ठिकाणी नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, असा मतप्रवाह सुरु झाला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, आमची धारणा आहे सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकीदरम्यान उमदेवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? आम्ही स्वइच्छेने माघार घेतल्यामुळे काहीच करु शकत नाही. परंतु उमेदवारावर कोणाचा दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

मतदानाचा जागतिक विक्रम

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या निवडणुकीत जागतिक विक्रम झाल्याचे सांगितले. जगात प्रथमच ६४ कोटी २ लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जगभरातील कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येने मतदान झाले नाही. देशातील ३१ कोटी २० लाख मतदारांनी मतदान केले. देशातील ज्येष्ठ लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले.

देशात कुठेही हिंसाचार नाही…

देशातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत होती. १३५ स्पेशल ट्रेन सातत्याने निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करत होते. या निवडणुकीत देशात कुठेही हिंसा झाली नाही. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु होते. मणिपूर, काश्मीर यासारख्या ठिकाणी शांततेत मतदान झाले. काश्मीरमध्ये  51.05 टक्के मतदान झाले. आता जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाचे महत्वाचे मुद्दे

  • निवडणुकीत कुठेही पैसे वाटप किंवा वस्तू वाटप झाले नाही.
  • निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री असो की राज्याचे मंत्री सर्वांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
  • राजकीय नेत्यांचे जितके नातेवाईक उच्च पदावर होते, त्यांना निवडणूक काम दिले गेले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;