पंकजा मुंडे ते जानकर… निकालाआधीच उमेदवारांच्या प्रतिक्रिया, कुणाला काय वाटतंय?

पंकजा मुंडे ते जानकर… निकालाआधीच उमेदवारांच्या प्रतिक्रिया, कुणाला काय वाटतंय?

लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता संपुष्टात आला असून शनिवारी १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं. उदया ४ जून रोजी मतमोजणी होणार असून अंतिम निकाल जाहीर होतील.शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल्स जाहीर झाले. देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचं अनेक पोल्समधून सांगण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र विरोधकांनी एक्झिट पोल्सचे हे अंदाज मान्य करण्यास नकार दिला असून यावेळेस निकाल वेगळा लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मतमोजणीला अवघे काही तास उरले असून महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी, उमेदवारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंकजा मुंडे, महादेव जानकर, संजोग वाघेरे यांच्यापासून ते रविंद्र धंगेकर यांच्यापर्यंत अनेकांनी निवडणूक निकालाबद्दल भाष्य करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्याविरोधात त्यांची लढाई आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. उद्या मतमोजणी आहे, दिवसभर काम करावे लागते. अनेक राजकीय लोकांची अडचण होवू नये यासाठी आजचे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहे. हरण्यापेक्षा आम्ही लढणे शिकलो आहे. उद्या देशाचा महानिकाल आहे. धाकधूक वाटायला मला वेळ मिळाला नाही.निकाल काय लागेल याकडे अपेक्षा आहे. मला पोल मध्ये आघाडी दाखविली मी भाग्यवान आहे. मात्र सर्टिफिकेट आल्यावर मी यावर बोलेन.जातीपातीच्या राजकारणाचा फटका या निवडणुकीत बसत असतोच, मात्र माझा विजय निश्चित आहे, असं त्या म्हणाल्या.

महादेव जानकर

परभणीतून महायुतीचे उमेदवार होते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, त्यांच्याविरोधात संजय जाधव हे उभे होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ते गोपीनाथ गडावर आले होते. ‘ गोपीनाथ मुंडे हे आमचे आयडॉल आहेत . मुंडे साहेबांमुळेच बहुजनातील लोकांना सत्तेचा वाटा मिळाला. मी आणि पंकजाताई खासदार होवून पुन्हा साहेबांच्या दर्शनाला येणार’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही सर्व समाजाला घेऊन पुढे चाललो आहेत. उद्या ताईचा आणि माझा विजय ठरलेला आहे. एक्झिट पोलचा अंदाज काहीही असू द्या, आम्ही उद्या विजयी होवून गोपीनाथ गडावर खासदार म्हणून वंदन करण्यासाठी येणार आहोत, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

उद्या गुलाल आमचाच असणार – रविंद्र धंगेकर

पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची लढत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात झाली. उद्या गुलाल आमचाच असणार आहे असे म्हणत सतत चर्चेत असणाऱ्या धंगेकरांनी उद्याच्या निकालाबद्दल विश्वास खात्री व्यक्त केली. एक्झिट पोलमध्ये धंगेकर हे पिछाडीवर दाखवण्यात आले होते. मात्र आपणच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त लीड माझा असणार. एक्झिट पोलमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला. बॅनर्स लावले म्हणजे खासदार झाले असं नाही, अन्यथा बॅनर्स बनवणारे पेंटर खासदार झाले असते. पुणेकरांचा उमेदवार उद्या गुलाल उधळणार.’ असं ते म्हणाले.

निलेश लंके काय म्हणाले ?

अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निलेश लंके वि. भाजपच्या सुज विखे पाटील यांची लढत आहे. एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. लंके यांनीही त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत , माझा प्रत्येक कार्यकर्ता उद्या दिवाळी साजरी करेल अस म्हटलं. आत्तापासूनच माझ्या विजयाचे बॅनर अनेक गावात लागले आहेत , त्यामुळे शंभर टक्के माझाच विजय होईल असं निलेश लंके म्हणाले .

जनतेला माझा विजय समर्पित करणार – वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमध्ये मविआतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आहे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्वल निकम. ही लढत चुरशीची समजली जात असली एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. त्यांनीही विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. मी काम करणारी व्यक्ती आहे, निकालाबद्दल माझ्या मनात अजिबात धाकधूक नाही. जनता आमच्या सोबत, वडिलांचा आशिर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन कामी आलं आहे. मी जनतेला माझा विजय समर्पित करणार, असं त्या म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;