Exit Poll 2024 : या 6 राज्यात INDIA आघाडीने NDA ला दाखवले आस्मान, एक्झिट पोलच्या आकड्यांनी सर्वच हैराण

Exit Poll 2024 : या 6 राज्यात INDIA आघाडीने NDA ला दाखवले आस्मान, एक्झिट पोलच्या आकड्यांनी सर्वच हैराण

Exit Poll 2024 : 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान झाले आणि लोकशाहीच्या उत्सवातील अंतिम पडाव पूर्ण झाला. आता 4 जूनच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागेल आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागलीच एक्झिट पोल जाहीर झाले. सर्वांनीच भाजपच्या बाजूने एकमत दिले आहे. पण काही राज्यांत भाजपच्या विजयाला काँग्रेस सुरुंग लावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, NDA आणि I.N.D.I.A आघाडीत देशभरात काँटे की टक्कर होईल. देशातील काही राज्यात काँग्रेस आघाडी चमत्कार दाखवेल.

कोणती आहेत ही राज्ये

एबीपी न्यूज-सी वोटर एक्झिट बोल नुसार, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, जम्मू-काश्मीर, हरियाणा, गोवा आणि पंजाबमध्ये NDA च्या विजयाचा मार्ग प्रशस्त नाही. तर त्यात अनेक अडचणी आहेत. मतदानाच्या टक्केवारीवर अर्थातच इंडिया आघाडीचे प्राबल्य दिसून येते. भाजप नेतृत्वातील एनडीएला या राज्यात मोठी धोबीपछाड मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केरळमध्ये भाजपचे काय गणित

केरळमध्ये काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 42 टक्के, एनडीएला 23 टक्के तर एलडीएफला 33 टक्के तर इतरांना 2 टक्के मतदान मिळण्याची दाट शक्यता आहे.

तामिळनाडूत इंडियाची आघाडी

तामिळनाडूवर यंदा भाजपचे बारीक लक्ष होते. तरीही इंडिया अलायन्स आघाडीवर असण्याची शक्यता आहे. या राज्यात इंडियाला आघाडीला 46 टक्के, NDA ला 19 टक्के, AIADM ला 21 टक्के तर इतरांना 14 टक्के मत मिळण्याची शक्यता आहे.

तेलंगणात पारडे जड

एबीपी न्यूज-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, तेलंगणामध्ये इंडिया आघाडीला 39 टक्के, एनडीएला 33 टक्के, बीआरएसला 20 टक्के तर AIMIM ला 2 टक्के आणि इतरांना 6 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.

गोवा सांगा कुणाचे?

गोव्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गोवा आणि भाजप हे समीकरण पक्के आहे. पण यावेळी लोकसभेत चित्र पालटण्याचा अंदाज आहे.  इंडिया आघाडीला 46 टक्के, NDA ला 45 टक्के तर इतरांना 9 टक्के जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हरियाणाचा चौधरी कोण?

हरियाणामध्ये एमएसपी आणि इतर मागण्यांवरुन शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला आहे. दिल्लीच्या सीमा रेषेवर जे रणकंदन झाले. त्याचे अवघे जग साक्षीदार झाले. या राज्यात  काँग्रेस आघाडीला 45 टक्के, भाजप नेतृत्वातील एनडीएला 42.8 टक्के तर इतरांना 12.2 टक्के मतदान मिळू शकते.

पंजाबचा सरकार कोण?

पंजाबमध्ये विधानसभेला आपने जोरदार मुसंडी मारली होती. काँग्रेस आणि आपचे आता आता सुर जुळले.  INDIA आघाडीला 32.7 टक्के, NDA ला 21.3 टक्के तर शिरोमणी अकाली दलाला 21 टक्के मत मिळण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;