Maharashtra Exit Poll 2024 : बारामतीकरांची लेकीला की सुनेला पसंती? पोलमध्ये धक्कादायक निकाल समोर

Maharashtra Exit Poll 2024 : बारामतीकरांची लेकीला की सुनेला पसंती? पोलमध्ये धक्कादायक निकाल समोर

देशातील लोकसभा निवडणुकीचं अंतिम टप्प्यातील मतदान पार पाडलं आहे. मतदान झाल्यावर देशभरातील निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामधील राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून चकीत करणारा एक्झिट पोल करणारी आकडेवारी समोर आली आहेत.  Tv9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचं चित्र दर्शवलं आहे. राज्यात पाच जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असं पोलमध्ये दाखवलं आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने होत्या. पवारांच्या घरातील सदस्य प्रथमच  खासदारकीला एकमेकांविरोधात उभे होते. मात्र टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागा तर महायुतीला 22 जागा मिळणार आहेत.

महायुतीच्या 22 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 18 त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळणार असल्याचं दाखवत आहे. मात्र पाच जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं पोलमध्ये दाखवत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी हे धक्कादायक आहे.  शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजय मिळवणार असल्याचं दाखवत आहे.

मविआमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक १४, काँग्रेस ५ आणि शरद पवार गटाला ६ जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.  अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीमध्ये असूनही त्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही. कारण बंड करत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही आपली जादू दाखवता आली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;