Election Exit Poll 2024 LIVE: एनडीएला किती आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळतील?

Election Exit Poll 2024 LIVE: एनडीएला किती आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळतील?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपेल. आज मतदान पार पडल्यावर संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. या पोलमधून देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. दरम्यान पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून आज 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार आहे.  मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही मेगा ब्लॉग कायम असून मध्य रेल्वेच्या जवळपास 534 लोकल फेऱ्या रद्द. ठाण्यात फलाट क्रमांक 5 चं काम अंतिम टप्यात असून आज संध्याकाळी पर्यत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र परवा शेवटच्या टप्यातील काम पूर्ण करून फलाट प्रवाशासाठी खुला केला जाईल. या ब्लॉकमुळे मध्ये रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. नियंत्रणसाठी 250 हून अधिक रेल्वे पोलीस आणि टीससी तैनात करण्यात आले आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;