Exit Poll Maharashtra : ‘बाप बाप होता है…’, शरद पवार गटाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे
लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर शनिवारी एग्झिट पोल समोर आला. ‘टीव्ही ९ मराठी’ने महाराष्ट्राचा एग्झिट पोल जाहीर केला आहे. त्या पोलमध्ये महायुतीला मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे दिसत आहे. असली, नकलीची निवड जनतेने एग्झिट पोलमध्ये केली आहे. एग्झिट पोल हा अंदाज असून प्रत्यक्षात निकाल ४ जून रोजी येणार आहे. या सर्व्हेमध्ये सर्वाधिक फटका अजित पवार यांना बसला आहे. त्यांना एकही जागा मिळत नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होत आहे. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा अंदाज आहे.
शिंदेंना धक्का, ठाकरेंची बाजी
राज्यातील राजकारणात दोन वर्षांत मोठे बदल झाले. शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० पेक्षा जास्त आमदार एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला फटाका बसल्याचे एग्झिट पोलमध्ये दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना फायदा झाल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागत आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना १४ जागा मिळाल्या आहेत.
अजित पवार यांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी महायुतीसोबत सत्ता स्थापन केली. काका-पुतण्यामधील या वर्चस्व वादात शरद पवार यांना बाप बाप होता है…हे एग्झिट पोलमध्ये दाखवून दिले आहे. या एग्झिटपोलमध्ये शरद पवार गटाला सहा जागांवर विजय मिळाला आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरलेल्या बारामती येथील जागेवर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होताना एग्झिट पोलमध्ये दिसत आहे.
| पक्ष | जागा |
| भाजप | १८ |
| शिवसेना | ४ |
| राष्ट्रवादी | ०० |
| काँग्रेस | ५ |
| ठाकरे गट | १४ |
| शरद पवार गट | ६ |
| इतर | १ |
एग्झिटपोलमध्ये राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. भाजपला १८ जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List