ध्यानधारणेवरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदींना डिवचलं; म्हणाले, चारही बाजूने कॅमेरा लावून…

ध्यानधारणेवरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदींना डिवचलं; म्हणाले, चारही बाजूने कॅमेरा लावून…

भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील ‘विवेकानंद मेमोरिअल रॉक’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र नोदी हे ध्यानधारणा करत आहेत. जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं. त्याच दगडावर बसून पंतप्रधन नरेंद्र मोदी ध्यान करत आहेत. ध्यान करतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही समोर आले आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. चारही बाजूने कॅमेरा लावून मोदी ध्यानधारणा करत आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी चारही बाजूने कॅमेरा लावून कोण ध्यान धारणा करत आहेत, असं ध्यान कोण करतं? कुंभकर्णाला चार जून नंतर जाग करू… पूर्वीच्या लोकांनी ध्यान धारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? 3000 सुरक्षारक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाला हाताशी पकडुन आपल्या सोयीच्या तारखा घेतल्या आहेत. राजकारणातील सेलिब्रिटी यांच्या तारखा बघून मुद्दामून मोदींनी स्वतःची निवडणूक शेवट ठेवली, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

राहुल गांधींना पाठिंबा

4 जूनला कळेल की इंडिया आघाडी जिंकतीये. संपूर्ण देश राहुल गांधी यांच्यासोबत आहे. आम्ही सगळे राहुल गांधींच्या बाजूने आहोत. मुद्दाहून राहुल गांधी याना बदनाम करण्यात आला आहे. या निवडणुकीत त्यांनी फार मेहनत केली आहे. ते आपण सगळ्यानी पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं संजय राऊत म्हणाले.

पुण्यातील अपघातावर काय म्हणाले?

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यंत्रणांचा दुरुपयोग केला आहे. राजकीय व्यक्तीचा हात आहे. एकाला वाचवण्यासाठी किती लपवाछपवी करणार? संपूर्ण सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भर रस्त्यावर जो दारू पिऊन खून करतो. त्यामध्ये किती दबाव आणला गेला, हे लोकांसमोर आलं आहे. रविंद्र धंगेकर यांचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सगळं प्रकार बाहेर आणलं, असं संजय राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;