मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा परीक्षेवर काय परिणाम, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा परीक्षेवर काय परिणाम, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. तांत्रिक कामासाठी 63 तासांचा जम्बो ब्लॉक असेल. 30 मे 2024 रोजी मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकात तर सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान 36 तासांचा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

1 जून रोजी सुट्टी

मुंबई विद्यापीठातील संलग्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1 जून 2024 रोजी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या शनिवार सुट्टी दिल्याने महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येणे अनिवार्य असेल.

आजच्या परिक्षेवर नाही परिणाम

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षावर परिणाम झाला नाही. आज विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या.परंतु आजच्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षेवर झाला नाही. सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.

  • विज्ञान शाखेच्या ३ परीक्षा
  • अभियांत्रिकी शाखेच्या २७ परीक्षा
  • वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८ परीक्षा
  • मानव्य विज्ञान शाखेची १ परीक्षा
  • आंतर विद्याशाखेच्या ४ परीक्षा

दोन परीक्षा पुढे ढकलल्या

रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या २ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कामासाठी ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाणे गैरसोयीचे होणार आहे. यामुळे शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शनिवार दिनांक १ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ चा एक व बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ चा एक अशा दोन परीक्षा होत्या. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;