मंडी लोकसभा निकाल 2024: कंगना राणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह; कोण मारणार बाजी?

मंडी लोकसभा निकाल 2024: कंगना राणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह; कोण मारणार बाजी?

हिमाचल प्रदेशच्या चार लोकसभा जागांपैकी मंडी (Mandi Lok Sabha Constituency) लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut BJP Candidate) उतरली आहे. तिच्या विरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh Congress Candidate) निवडणूक लढवत आहेत. भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

छोटी काशी म्हणून ओळखलं जाणार मंडी हे आधी मांडव्य या नावाने प्रसिद्ध होतं. सुमारे 10 लाख लोकसंख्येचा हा जिल्हा व्यापार आणि वाणिज्यच्या सर्वांत व्यस्त केंद्रांपैकी एक आहे. इथली सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ही शेती आहे. मंडी जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. इथे तांदूळ, कडधान्य, बाजरी, चहा, तीळ, शेंगदाणे, सूर्यफुलाचं तेल आणि वनौषधींचं उत्पादन केलं होतं. मंडी जिल्ह्यातील खालच्या डोंगराळ भागात शेतकरी रेशीम पिकवतात. मंडीतील शेतकरीच बाजारात सर्वांत कमी किंमतीत कच्ची रेशीम उपलब्ध करून देतात. याठिकाणी सफरचंदाचंही सर्वाधिक उत्पादन होतं. याशिवाय इथली लोकं पर्यटनावरही अवलंबून आहेत.

मंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत झालेल्या 15 निवडणुकांपैकी काँग्रेसच्या उमेदवारांनी 10 वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. या मतदारसंघात 17 विधानसभेच्या जागा आहेत. यामध्ये भरमौर, लाहौल आणि स्पीती, मनाली, कुल्लू, बंजार, अनी, कारसोग, सुंदरनगर, नाचन, सिराज, दरांग, जोगिंदरनगर, मंडी, बाल्ह, सरकाघाट, रामपूर आणि किन्नौर यांचा समावेश आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या 2014 च्या अहवालानुसार या लोकसभा मतदारसंघात 11.50 लाख मतदार आहेत.

2019 चा निकाल

2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम स्वरुप शर्मा जिंकून आले होते. त्यांना 647,189 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे आश्रय शर्मा 2,41,730 मतांसह दुसऱ्या स्थानी आणि सीपीआय(एम)चे दिलीप सिंग कायथ हे 14,838 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

2014 चा निकाल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम स्वरुप शर्मा यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांचा 39 हजार मतांनी पराभव केला होता. रामस्वरुप शर्मा यांना 3.62 लाख आणि प्रतिभा सिंह यांना 3.22 लाख मतं मिळाली होती. माकपचे कुशल भारद्वाज तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना सुमारे 14 हजार मतं मिळाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;