राज्याच्या मंत्र्यांना ‘बत्ती गुल’चा फटका, अर्धा तास बंगल्यांमधील वीज पुरवठा खंडित
राज्यभरात उन्हाचा फटका चांगलाच बसत आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. प्रचंड तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागांत वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी होत असतात. काही भागांत भारनियमन केले जात असते. त्याविरोधात ग्रामस्थ अनेक वेळा तक्रार करतात. आंदोलनही करतात. परंतु शुक्रवारी राज्याच्या कारभार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यात वीज पुरवठा खंडित झाला. सतत २४ तास वीज पुरवठा मिळणाऱ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नेहमी वातानुकूलीत घरांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घामघूम व्हावे लागले आहे.
पत्रकार परिषद सुरु असताना बत्ती गुल
राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने दक्षिण मुंबई भागात येतात. या भागात बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यावर त्वरित बेस्ट इलेक्ट्रिसिटी विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु अर्धातासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता.
अजित पवार, आदिती तटकरे, शंभूराज देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी वीज पुरवठा खंडित झाला होता. शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याचा प्रकार घडला. यामुळे बंगल्यामधील वातनुकूलीत यंत्रणेसह सर्वच कामकाज ठप्प झाले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
तासाभराने वीजपुरवठा सुरळीत
मंत्रालयासमोर असलेल्या मंत्रांच्या घरातली गेलेली लाईट एक तासानंतर परत आली. ट्रान्फर्मर ट्रिप झाल्याने केबल खराब झाली होती. त्यामुळे तासाभर मंत्राच्या घरातील बत्ती गूल झालेली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर आता लाईट पूर्वपदावर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List