विक्रोळीत म्हाडाच्या जुन्या इमारतीच्या छताचा भाग कोसळला, दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

विक्रोळीत म्हाडाच्या जुन्या इमारतीच्या छताचा भाग कोसळला, दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर क्रमांक -1 , रमाबाई आंबेडकर उद्यानजवळील इमारत क्रमांक 40 च्या छताचा काही भाग अचानक कोसळून त्यात दोन ज्येष्ठ नागरिक अडकल्य़ाची घटना गुरुवारी सायंकाळी 6.50 वाजताच्या दरम्यान घडली. ही घटना कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या रहीवासी इमारतीच्या ढीगाऱ्यातून दोघांची सुटका केली. या दोघा जणांना जखमी अवस्थेत डॉ.आंबेडकर रुग्णालयात भरती केले. परंतु तेथे तपासून त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

विक्रोळी येथील म्हाडाच्या 40 क्रमांकांच्या चार मजली इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळून दोन रहिवाशी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले. अग्निशमन दलाने दोघा रहिवाशांची ढीगाऱ्यातून सुटका केली, परंतू ते खूपच गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने डॉ. आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यांची नावे सूरेश म्हाढलकर ( वय 78 ) , शरद म्हसळेकर ( वय 75 ) अशी आहेत.

ढीगाऱ्याखाली जेसीबीचालक गाडला गेला

वसईच्या वर्सावा पुलाजवळ मातीचा ढीगारा खचल्याने एक जेसीबी चालक वाहनासह त्या ढीगाऱ्याखाली दबला गेल्याची घटना काल घडली. सुर्या प्रकल्पाच्या पाईप लाईनचे काम सुरु असताना ढीगारा कोसळून 24 तास उलटून सुद्धा या जेसीबी चालकाला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेले नाही. त्यामुळे जेसीबी चालकाचे कुटुंब हवालदील झाले असून त्यांनी प्रशासनावर आरोप केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;