सोलापुरातील ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त…; स्थानिक म्हणाले, आम्हाला अतीव दुःख…

सोलापुरातील ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त…; स्थानिक म्हणाले, आम्हाला अतीव दुःख…

गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापुरातील मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. सोलापुरातील लक्ष्मी मीलमधील ऐतिहासिक अशी चिमणी आज पाडण्यात आली. अंतरिक्ष इन्फ्राकॉन या कंपनीच्या मालकी असलेल्या जागेतील ही चिमणी धोकादायक असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने दिला होता. त्यानंतर खासगी कंपनीतर्फे ही चिमणी पाडण्यात आली. ही चिमणी पडण्यासाठी जवळपास पावणे दोन तास लागले. एकेकाळी कापड मिलचं भंडार असलेल्या सोलापुरात चिमणीशी स्थानिकांचं वेगळंच नातं आहे. आज लक्ष्मी मीलमधील चिमणी पाडण्यात आल्यानंतर स्थानिकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

अन् अखेर लक्ष्मी मिलची चिमणी पाडली…

सोलापूरच्या मरीआई चौकातील लक्ष्मी मिलची अखेरची ओळख आज संपुष्टात आली आहे. लक्ष्मी मीलमधील ऐतिहासिक अशी चिमणी आज पाडण्यात आली. सोलापूर महापालिकेने या मिलला धोकादायक शेरा दिल्याने ही चिमणी पाडण्यात आली. ही चिमणी पडण्यासाठी पावणे दोन तास लागले. यावरून सोलापूरकर भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

जागा मालक महेश भंडारी यांची प्रतिक्रिया काय?

सोलापूरची ओळख असलेल्या लक्ष्मी मिलची चिमणी पाडली याचं आम्हाला अतीव दुःख आहे. कारण ही चिमणी म्हणजे सोलापूरची ओळख आहे मात्र ती धोकादायक बनली होती. तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार ही चिमणी 3 डिग्रीमध्ये झुकली होती. त्यामुळे आम्हाला चिमणी पाडावी लागली. चिमणी पाडल्याचा आम्हाला आनंद झाला नाही मात्र इतरांच्या जीविताला त्यामुळे धोका निर्माण झाला असता. या सर्व कारणामुळे चिमणी पाडली आहे. मात्र चिमणी पाडली याचं आम्हाला अतीव दुःख आहे, असं ज्या ठिकाणी ही चिमणी होती त्या जागेचे मालक महेश भंडारी यांनी म्हटलं आहे.

अंतरिक्ष इन्फ्राकॉन या कंपनीच्या मालकी असलेल्या 20 एकर जागेतील ही चिमणी धोकादायक असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने दिला होता त्यामुळे ही चिमणी पाडली. त्यानंतर खासगी कंपनीतर्फे ही चिमणी पाडण्यात आली आहे. ही चिमणी पडण्यासाठी जवळपास पावणे दोन तास लागले, असंही महेश भंडारी यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;