Solapur Election : ‘लाखो रुपये घेऊन…’, नरसय्या आडम यांचं काँग्रेसबाबत खळबळजनक विधान

Solapur Election : ‘लाखो रुपये घेऊन…’, नरसय्या आडम यांचं काँग्रेसबाबत खळबळजनक विधान

सोलापूरमधील माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीबाबत खळबळजनक विधान केलं आहे. “लोकसभा निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते. मात्र, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही” असं नरसय्या आडम म्हणाले. “इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल या भ्रमात राहू नका. आत्तापासूनच त्यांचे कट चालू आहेत” असं नरसय्या आडम म्हणाले. “लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसकडून एक रुपया ही न घेता प्रामाणिकपणे काम केलं. त्यावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले. मात्र, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही” असं नरसय्या आडम म्हणाले.

“कोणाचा ही एक रुपया न घेता माकपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान दाखवत लाल झेंड्याला आपण खऱ्या अर्थाने सलामी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल या भ्रमात राहू नका. आत्तापासूनच त्यांचे कट चालू आहेत. आपल्या ताकदीवर विधानसभेसाठी सोलापुरातून आपला झेंडा फडकवावा लागणार आहे” असं नरसय्या आडम म्हणाले.

विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत

माकपचे जेष्ठ नेते आणि सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. सोलापुरातील सिटूच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी हे म्हटलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माकप आणि आडम मास्तर यांनी सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत केला होता प्रचार.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;