मोदी 3.0, भाजपला किती जागा मिळणार, ब्रोकरेज हाऊसचे आकडे आलेत…

मोदी 3.0, भाजपला किती जागा मिळणार, ब्रोकरेज हाऊसचे आकडे आलेत…

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे आली आहे. आता शेवटचा सातवा टप्पा 1 जून रोजी शन‍िवारी होणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून जाहीर होणार आहे. यामुळे या दिवशी कोणाला किती जागा मिळणार? हे स्पष्ट होणार आहे. परंतु राजकीय विश्लेषक निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी करत आहेत. आता भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार की 2004 प्रमाणे ‘इंडिया शायनिंग’ सारखी परिस्थिती होईल, हे 4 जून रोजी समजणार आहे. आता देशातील विविध ब्रोकरेज हाऊसकडून भाजपला किती जागा मिळणार? त्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस फिलिपकॅपिटल, आयआयएफएल, जेएमएफएल आणि बर्नस्‍टीन यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएला ब्रोकरेज हाऊसने किती जागा दिल्या आहेत…

काय आहे अंदाज

फिलिपकॅपिटलच्या अंदाजानुसार, बेस केस म्हणजेच सामान्‍य परिस्‍थ‍ित‍ीत भाजपला 290-300 जागा मिळतील तर एनडीएला 330-340 जागा मिळणार आहेत. निकाल या अंदाजानुसार आल्यास इक्विटी, कॉर्पोरेट आय आणि अर्थव्यवस्थेत सकारात्मक दृष्टिकोण दिसणार आहे. या ब्रोकरेज हाऊसने बुल केस म्हणजेच आक्रामक परिस्थितीत भाजपला 325 जागा मिळणार असल्याचे जाहीर केले. तसेच एनडीएला 360 जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. बियर केस म्हणजे खराब परिस्‍थ‍ित‍ीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. परंतु एनडीएचे सरकार येईल.

इतर ब्रोकरेज हाऊसचा अंदाज काय?

ब्रोकरेज हाऊस आयआयएफएलने बेस केसमध्ये भाजपला 320 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेएमएफएलनुसार भाजप 299 जागांवर विजयी होईल. बियर केसमध्येही भाजपला 290 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बुल केसमध्ये भाजपला 310 जागा मिळतील.

ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनचा भाजप आणि एनडीएबाबतचा अंदाज खूपच जास्त आहे. बेस केसमध्ये, त्यांनी एनडीएला 330-350 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुल केसमध्ये एकट्या भाजपला 290 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर एनडीएला 340 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. एकंदरीत बहुतांश ब्रोकरेज हाऊसचा अंदाज भाजपच्या बाजूने आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल, असे त्यांना वाटते. 2004 मधील ‘इंडिया शायनिंग’च्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;