काऊंटडाऊन सुरु, काही तासांत देशात मान्सूनचा शंखनाद, या राज्यांमध्ये होणार आबादानी

काऊंटडाऊन सुरु, काही तासांत देशात मान्सूनचा शंखनाद, या राज्यांमध्ये होणार आबादानी

India Monsoon : यंदा उन्हाळ्याने भल्याभल्यांचा घामाटा काढला. उन्हाचा कहर झाला. उष्ण वाऱ्याने कुलरला पण यंदा बाद केले. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात पाऱ्याने रेकॉर्ड मोडीत काढले. मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात उकाड्याने नागरिक हैराण झाले. सर्वच जण मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आता मान्सूनने सांगावा धाडला आहे. अवघ्या काही तासांतच या राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या पूर्व अंदाजानुसार, गुरुवारी, 30 मे 2024 रोजी मान्सून केरळच्या किनारी आणि पूर्वोत्तर भागात दाखल होईल. त्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.

24 तासांत पावसाचा शंखनाद

भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी 24 तासांत मान्सूनचे चित्र कसे असेल, याचा अंदाज वर्तविला. पुढील 24 तासांत मान्सून केरळच्या दक्षिण-पश्चिम भागात दाखल होईल. त्यासाठीचे अनुकूल वातारवरण दिसत असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी आयएमडीने 15 मे रोजी, केरळात मान्सून 31 मेपर्यंत आनंदवार्ता पेरणार असल्याचा दावा केला होता.

मान्सूनचा सांगावा लवकर कसा?

हवामान तज्ज्ञांनुसार, रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. या वादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचून घेतला. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यात मान्सून लवकर दाखल होत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला. परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

पूर्वोत्तर राज्यात आनंदवार्ता कधी?

हवामानातील या बदलामुळे तर चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर राज्यात लवकरच आबादाणी होणार आहे. पूर्वोत्तरमधील अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिजोरम, मणिपूर आणि आसाम या राज्यात पाऊस 5 जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

या भागात सुद्धा साखरपेरणी

याच कालावधीत दक्षिण अरब सागराचा काही भाग, मालदीव, कोमोरिन, लक्षद्वीपचा काही भाग, दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर-पूर्वी बंगालचा उपसागर, पूर्वोत्तर राज्यातील काही भाग यामध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

हवामान खाते केव्हा करते मान्सूनची घोषणा ?

केरळमधील 14 केंद्र आणि आजुबाजूच्या परिसरात सलग दोन दिवसांत 2.5 मिमी अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. आऊटगोईंग लाँगवेव रेडिएशन कमी होते. हवा दक्षिण-पश्चिम अशी वाहते तेव्हा हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येतो. साधारणपणे आयएमडी 10 मे नंतर कोणत्याही वेळी केरळमध्ये मान्सूनची घोषणा या घडामोडींच्या आधारे करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;