राज्यासाठी मे ठरला किलर मंथ, तर ठाण्यात चार महिन्यात हिट अँड रनचे 36 बळी

राज्यासाठी मे ठरला किलर मंथ, तर ठाण्यात चार महिन्यात हिट अँड रनचे 36 बळी

मे महिन्यात हिट अँड रन, केमिकल कंपनीत स्फोट आणि धरण आणि बॅट वॉटरमध्ये बुडून अनेक जीव गेले. मे हा किलर महिना ठरला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, पोर्शे अपघात, डोंबिवली केमिकल कंपनीतील स्फोट तर इतर अनेक घटनांमध्ये गेल्या १७ दिवसांत ६२ जणांचा बळी गेला. पुण्यातील कल्याणीनगरातील कार अपघाताचे प्रकरण तर देशभरात गाजले. त्यात दोन अभियंत्यांचा जीव गेला होता. धरणात पोहण्यसाठी गेलेल्या काही जणांचा बुडून मृत्यू ओढावला.

ठाण्यात चार महिन्यांत हिट ॲण्ड रनचे ३६ बळी

  • जानेवारी 2024 पासून वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नजर टाकली असता तरुणाई मस्तीत धुंद असल्याचे दिसते
  • कारवाईत ड्रंक अँड डाईव्हनुसार १ हजार ४५ जणांची झिंग पोलिसांनी उतरवली आहे. मात्र त्याचवेळी हिट अँड रनच्या २३ घटना समोर आल्या आहेत.
  • त्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. जीव गमावलेले बहुतेक तरुण सल्याचे समोर आले आहे.
  • २६ अल्पवयीन वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे.
  • वाहन परवाना नसताना देखील गाडी चालवणाऱ्या २९५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • तर 106 जण कायमचे जायबंदी झाले आहेत.

मे ठरला किलर मंथ

  1. मे महिन्यात १३ मे – रोजी मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला.
  2. १९ मे – पुणे पोर्शे कार अपघात – पुण्यात पोर्शे कार अपघात २ जणांचा मृत्यू झाला,
  3. २१ मे – सोलापूर बोट उलटून कुटुंबाचा मृत्यू
  4. २२ मे – नाशकात मामा-भाचे बुडाले
  5. २३ मे – प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट बुडाली, ५ जणांचा मृत्यू
  6. २३-मे – डोंबिवली ब्लास्ट, १६ जणांचा मृत्यू
  7. २४ मे – वेंगुर्ले बंदरात मच्छिमारांची होडी उलटली, यात ४ जणांचा मृत्यू झाला.
  8. २४ – मे सायन रुग्णालय अपघात – १ मृत्यू
  9. २९ मे – कार कालव्यात कोसळली, कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
  10. या महिन्यात एकून ९ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत, ज्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत दोन दिवस चौकशी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत चौथ्या (पडलेल्या) होर्डिंगमधून लोहमार्ग पोलिसांना सर्वाधिक रक्कम मिळाल्याचे समोर आले आहे. उर्वरित तीन होर्डिंगमधून १३ लाखांची रक्कम मिळत होती तर चौथ्या होर्डिंगमधून ११ लाखांहून अधिक रक्कम ही रेल्वे पोलिसांच्या खात्यात जमा होत असल्याच चौकशीतून समोर आले आहे.

चौथ्या होर्डिंगला परवानगी का?

पहिल्या तीन होर्डिंगच्या आधारेच भिडे याला चौथ्या होर्डिंगसाठी खालिद यांच्या सांगण्यावरून परवानगी दिल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत निकम यांनी माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. होर्डिंगचं १० वर्षाचं कंत्राटही तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून ७ जुलै २०२२ रोजी वाढवल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिली. ७ डिसेंबर २०२१ पर्यंत पहिले तीन होर्डिंग ४०×४० होते. मात्र त्यानंतर त्याचा आकार ८०×८० करण्यात आला. १९ डिसेंबर २०२२ मध्ये चौथं होर्डिंग जे पडलं, त्याची साईज ही १४०×१२० करण्यात आल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;