Anjali Damania : ‘त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे’, अंजली दामानिया संतापल्या, दिला असा इशारा

Anjali Damania : ‘त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे’, अंजली दामानिया संतापल्या, दिला असा इशारा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिंचन घोटाळ्यापासून तर अनेक प्रकरणात त्यांची भूमिका मांडली. त्यांची भूमिका अनेकांना अडचणीची ठरली. आता दमानिया यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्या, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. ‘त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे’, असा सज्जड दम त्यांनी दिल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असा प्रकार पुन्हा झाल्यास त्या व्यक्तीला आपण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे?

तर मी सोडणार नाही

राजकारणात यांना महिलेने काही बोललेलं अजिबात खपत नाही. अशा महिलेला बाजूला करायचा असेल तर तिच्याबद्दल खालच्या दर्जाचा आणि वाटेल ते बोलले जाते. सुरज चव्हाण आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे. त्यांनी जी भाषा आता वापरली ही बाई काय रिचार्ज वर काम करते सुपारी घेते, असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे. यापुढे त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे, नाही तर मी त्यांना सोडणार नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

राजकारण्यांना यापुढे प्रश्न विचारायचे नाहीत का?

आता राजकारणात सगळ्यांना धडे हे शिकवलेच पाहिजेत. आम्ही जे प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून मिळाले पाहिजेत. जर तुम्ही खालच्या दर्जाची स्टेटमेंट केली तर यापुढे तुम्हाला सोडणार नाही. ही सुद्धा अद्दल तुम्हाला घडवायला पाहिजे म्हणून मला त्याची प्रतिक्रिया हवी आहे . त्यांच्याच पक्षातील रूपाली चाकणकर, चित्राताई वाघ, विरोधी पक्षातील सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी आहे या सगळ्यांकडून आपल्याला उत्तरं हवी आहेत. याच्यापुढे राजकारण्यांना महिलेने प्रश्न विचारायचे नाहीत का? प्रश्न विचारले म्हणूनतुम्ही असली थर्ड ग्रेड स्टेटमेंट राजकारणात खपवून घेणार का? असा प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे.

घोटाळ्यातील पैसा परत घेणार का?

मोदींनी एक ट्विट केले ते वाचून दाखवते, ‘जिसने खाया है उससे बाहर निकालूंगा जिसका खाया है उसको लौटाऊंगा’ हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं. मोदींची गॅरंटी त्यांनी परत परत जनतेला दिली ही पण गॅरंटी आहे का आणि असेल तर महाराष्ट्राचे 70 हजार चा जो स्कॅम झाला नंतर तो एक लाख दहा हजार कोटीपर्यंत गेला.त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडून परत घेणार का आणि महाराष्ट्राला परत देणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे, असे दमानिया म्हणाल्या.

सुरज चव्हाण यांनी काय केले होते आरोप

अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली होती. त्या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणारी बाई आहे. सुपारी मिळाली की मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासाचा अशी माझी सरकारकडे मागणी आहे, दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे, असे चव्हाण म्हणाले होते.

खोलात जायला लावू नका

सुषमा अंधारे, रविंद्र धंगेकर प्रसिद्धीसाठी पुणे प्रकरणात अतिरेक करत आहेत, दोघेही चमको नेते आहे. या दोघांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला खोलात जायला लावू नका, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;