मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. याशिवाय सामनातून देखील त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. पण या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांकडून राऊतांना नोटीस

तीन दिवसात माफी मांगा अन्यथा कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप सामनातून करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल.

प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी वाढले. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलाचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांचं ट्विट

संजय राऊत यांनी ट्विट करत या कायदेशीर नोटीसला उत्तर दिले आहे. पन्नास खोके एकदम ओके असं त्यांनी म्हटलं आहे. उलटा चोर कोतवाल को डांटे असे देखील त्यांनी म्हटले आहे.


फडणवीसांवर देखील गंभीर आरोप

नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस प्रचारासाठी आले. संघाचे लोकं असं नागपुरात म्हणत आहे असा दावा त्यांनी केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. त्यांनी वकिलांमार्फत ही नोटीस पाठवली आहे. संजय राऊत हे सध्या परदेशात आहे. तिथून आल्यानंतर ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;