विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीला मोठा अडथळा; स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे पेच वाढला

विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीला मोठा अडथळा; स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे पेच वाढला

राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यावरुन मोठी आरडा-ओरड झाली. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इतर स्थानिक संस्थांचे सदस्य यांना निवडून येण्याची संधी काही मिळालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. या निवडणुका रखडल्याचा फटका आता विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीला बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य संख्याबळ आहे. त्यात विधानसभा सदस्यांमधून निवडणून द्यावयाच्या ३० सदस्यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यांचा कारभार हाकण्यासाठी याठिकाणी प्रशासक नेमण्यात आला आहे. परिणामी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकांचा पेच निर्माण झाला आहे. या सहापैकी एक जागा ३१ मे रोजी रिक्त होत आहे, तर उर्वरित ५ आमदारांची मुदत २१ जूनला संपुष्टात येत आहे.

दोन वर्षांपासून जागा प्रलंबित

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून ९ जागा निवडून द्यायच्या आहेत. दोन वर्षांपासून या जागांना काही मुहूर्त लागलेला नाही. राज्यपाल नामनियुक्त जागांना पण उमेदवारांची प्रतिक्षा आहे. नामनियुक्तीच्या १२ जागा पण रिक्तच आहेत. आता या सर्व घडामोडींचा परिणाम विधान परिषदेच्या सदस्य संख्येवर पडणार नाही तर नवलच. विधान परिषदेच्या ७८ जागा आहेत. पण जून नंतर हा आकडा ५१ सदस्यांपर्यंत घसरणार आहे.

किती ठिकाणी प्रशासक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हाती आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद २८९ पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. या सर्व ठिकाणी सध्या प्रशासक राज आहे. याविषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे समजते.

पदवीधरसाठी भाजपची बैठक

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मंत्री रवींद्र चव्हाण याच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे.भाजपकडून निरंजन डावखरे पदवीधरसाठी इच्छुक आहेत. कोकणातील सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार आहे. तर मनसेने अभिजित पानसेंच्या नावाची घोषणा केली आहे. पण भाजप या जागेवर लढण्यासाठी ठाम असल्याचे समोर येत आहे.

कधी होणार निवृत्त

  • अनिकेत तटकरे, रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवृत्त ३१ मे २०२४
  • नरेंद्र भिकाजी, नाशिक, शिवसेना, निवृत्त २१ जून २०२४
  • रामदास आंबटकर, भाजपा, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, निवृत्त २१ जून २०२४
  • विप्लव बाजोरीया, परभणी तथा हिंगोली, शिवसेना, निवृत्त २१ जून २०२४
  • प्रविण पोटे-पाटील, अमरावती, भाजपा, निवृत्त २१ जून २०२४
  • सुरेश धस, उस्मानाबाद लातूर बीड, भाजपा, निवृत्त २१ जून २०२४

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;