नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा; नितीश कुमार हे काय बोलून गेले?

नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा; नितीश कुमार हे काय बोलून गेले?

लोकसभा निवडणूकांचा सहावा टप्पा शनिवारी पार पडला. बिहारच्या पाटणाच्या दनियावा लोकसभा मतदार संघात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रचारसभा सुरु होती. यावेळी भाषणात नितीश कुमार यांची जिभ घसरली. आम्ही बिहारात सर्व 40 जागांवर आणि देशभरात 400 जागा जिंकणार आहोत. नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनणार. म्हणजे देशाचा विकास होईल आणि बिहारचा विकास होईल. नंतर भानावर येत त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेतच आणि पुन्हा राहतील असे चुक दुरुस्त करीत सांगितले.

या प्रचारसभेत नितीश कुमार यांनी आरजेडीवर जोरदार टीका केली, त्या लोकांनी काही काम केले नाही. साल 2005 आधी संध्याकाळचे लोकं घाबरुन घराबाहेर पडायचे नाहीत. खूप भांडणे व्हायचीत. आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बकाल होती. रस्त्यांची दुर्दशा झाली होती. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा काही जागांवर रस्ते होते. इतर ठिकाणी पाऊलवाटा होत्या. त्यांना ( आरजेडी ) संधी मिळाली परंतू त्यांनी काही काम केले नसल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

लालूंवर संतापले

आरजेडीवर टीका करताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ‘आज ते आमच्याविरोधात टिका करतात की आम्ही काही काम नाही केले. परंतू हे संपूर्णपणे खोटं आहे.’ आपले एकेकाळचे सहकारी लालू यांचे नाव न घेता त्यांनी नितीश कुमार यांनी जोरदार टीका केली की एका माणसाने 9 मुला- मुलींना जन्म घातला आणि आता देखील मुलगा-मुलगी करीत आहे. आम्ही त्यांच्या सोबत सरकार स्थापन केले, परंतू  पाहीले की ते गडबड करीत आहेत असेही त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;