ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद, उमेदवारांचा जीव टांगणीला

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद, उमेदवारांचा जीव टांगणीला

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे महाराष्ट्रात झाले. पाचही टप्प्याचे मतदान 20 मे रोजी पूर्ण झाले. राज्यातील 48 जागांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. तोपर्यंत मतदान झालेले ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या स्ट्राँग रुमवर 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. परंतु जळगावात धक्कादायक प्रकार घडला आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. त्यानंतर उमेदवारांना धडकी भरली. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून ही माहिती कळवली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या माहितीला दुजोरा दिला. डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले असले तरी 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

काय घडला प्रकार

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा दलाचा पहारा आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर क्षणक्षणाला आहे. परंतु रविवारी 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला. हा डिस्प्ले सकाळी 9.04 मिनिटांपर्यंत म्हणेज चार मिनिटे बंद होते. त्यामुळे खळबळ उडाली. ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारींना दिली.

का बंद झाला डिस्प्ले

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले बंद झाला होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फोनवरून स्पष्टीकरण दिले. डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार उमेदवार आहे. या दुरंगी लढतीच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;