सनसनाटी विधानं, प्रवाहाविरूद्ध बोलणं यावरच बच्चू कडूंचं राजकारण टिकून; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल

सनसनाटी विधानं, प्रवाहाविरूद्ध बोलणं यावरच बच्चू कडूंचं राजकारण टिकून; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल

बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधान करतात. त्यांचं राजकारणच सनसनाटी विधान करणे.. आणि प्रवाहाविरुद्ध बोलणं या धरतीवर त्यांचं राजकारण अवलंबून आहे. आम्ही सत्तेचा सदुपयोग करतो. बच्चू कडू ही सत्तेत आहेत. त्यांच्याकडे दिव्यांग खाता आहे. त्याची जबाबदारी आहे. मग त्यांनीच सांगावं की त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की दुरुपयोग केला? मला वाटतं की नवनीत राणा यांच्या संदर्भात त्यांचं टोकाचा विरोध आहे आणि तो राग ते महायुती सरकारवर काढत आहेत, असं भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. आज सकाळी बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू काय म्हणाले होते?

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा निवडणूक हरतील, असा दावा केला. या निवडणुकीत एक पाहिलं तर, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिघांची युती होती. बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो, भाऊ नसतो. राजकारणात जर तर ला महत्व नसं. सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच मारलेली आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. चार तारीख ही प्रहारची आहे आम्ही निवडणूक जिंकणार आहे. लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहे आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहे. रवी राणांनी दोन वर्ष तोंड जरी बंद ठेवला असता तरी निकाल वेगळा राहिला असता, असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

प्रविण दरेकरांचं प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी दीर्घकालीन राजकारण करण्याचा विचार करावा. तात्कालीन विरोध करू नये असा माझा त्यांना सल्ला आहे.मला वाटतं अनेक पक्षाची लोक या कारवाईमध्ये आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. नवनीत राणांनी उमेदवारी केल्यापासून त्यांचा विरोध संपत नाही. त्यामुळे ते ईडीवर बोलत आहेत, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीला आणखी काही महिने बाकी आहेत. अनेक इलेक्शन होतील. मला वाटतं बच्चू कडू रागात संपात बोलत आहेत. ते महायुतीचे घटक आहेत. तथापि लोकशाहीत युती करून आघाडी करून निवडणूक लढवणार हा अधिकार आहे, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;