‘तो’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार, राज्याच्या राजकारणाला कलाटणी…; सुनिल तटकरे यांचा मोठा दावा

‘तो’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार, राज्याच्या राजकारणाला कलाटणी…; सुनिल तटकरे यांचा मोठा दावा

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील मतदान होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीत बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधानसभेसाठी संघटन मजबूत करण्याचे आम्ही ठरवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. 10 तारखेला वर्धापन दिन आहे. त्याच दिवशी ही नियोजन आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार आहे. हा प्रवेश महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणार असेल, असा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीची बैठक कधी?

सगळ्यांनी आपापल्या प्रतीने काम केलं. देशात आणि राज्यात काय होणार ह्याकडे सर्वांच लक्ष आहे. चार जूनच्या चर्चा सर्व वारंवर होत आहे. विजय आमचाच होणार आहे. 27 तारखेला राष्ट्रवादीची बैठक गरवारे क्लबमध्ये आयोजित केली आहे. सर्व नेते पधाधिकारी जिल्हाप्रमुख सगळ्यांना बोलावलं आहे. आता आम्ही स्पष्टपणे धोरण बांधलेलं आहे. एकच लक्ष विधानसभा धोरण… त्यामुळे अनेक पक्षप्रवेश या दिवशी होतील, असंही तटकरे म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीवर काय म्हणाले?

राज्यातला 5 टप्प्यांचा निवडणुका 20 तारखेला संपल्या. 60% आसपास मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदार उत्सपृतपणे मतदान करण्यासाठी आला. राष्ट्रीय पातळीची निवडणूक आणि राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न महायुतीने केला. विरोधकांना गल्ली बोलांपासून वेगवेगळ्या उत्तर देण्यात वेळ गेला. जी भाषा वापरण्यात आली त्या भाषेला छेद देण्याचा प्रयत्न देण्यात आला. या मुद्द्यावर महायुतीला राह्यभरत चांगलं यश मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 आणि 2019 ला जसा प्रतिसाद मिळाला तसंच आताही मिळाला.

महायुतीची समन्वयक बैठक बोलवावी हा ही एक मुद्दा आहे. राष्ट्रवादी पक्ष हा विधानसभेच्या अनुषंगाने ग्रामस्तरापासून सगळीकडे पोहचणार आहे. आगामी विधान सभेच्या निवडणुकी वर आमचे विशेष लक्ष आहे. पाणी टंचाई आणि दुष्काळ ह्यावर राज्य सरकार बैठक घेत आहे. पाणीटंचाईवर सरकारने उपाय योजना कराव्यात. अवकाळी पावसावर ही उपाययोजना कराव्यात राज्य सरकारला विनंती आहे, असंही सुनिल तटकरेंनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;