तर एकनाथ शिंदे यांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल; कुणी आणि कुणाला दिला हा इशारा?

तर एकनाथ शिंदे यांना कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल; कुणी आणि कुणाला दिला हा इशारा?

पुण्याचे ‘हिट एंड रन’ प्रकरण भयंकरच आहे, अग्रवालचे अनेक कारनामे ऊघड होत आहेत. कारवाई समाधानकारक होत आहे, रवींद्र धंगेकर आयुक्तालयासमोर आंदोलनास बसले आहेत, आयुक्ताच्या बदलीची मागणी करीत आहेत, पण ही ती वेळ नाही. धंगेकर राजकीय स्टंट करीत आहेत. कुणीही नेता, मंत्री असो सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. गोवा कनेक्शन काय ऊघड झालं पाहिजे अशी मागणी महायुतीचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. शिवसेनेने शिक्षक – पदवीधर निवडणूकांसाठी अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकर यांची निवड केली आहे. यावर अनिल परब यांनी वांद्रे येथे बॅनर लावण्याशिवाय काय केलेय. दीपक सावंत खरे निष्ठावंत होते ते विजयी होतील असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

अनिल परब अकलेचे तारे तोडत आहेत. कोणतीही चौकशी बंद होत नसतात. अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. गेल्या पावसाळ्यात मुंबईत नाले तुंबले नाहीत, ऊबाठा गटाला फोटोपाहून वंचीत राहावं लागलं, त्यांना श्रेय मिळालं नाही, म्हणून ते लंडनला गेले अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की रात्री ११.३० वाजता मराठवाड्यातील बैठक लावण्यात आली, त्या बैठकीला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील होते. आमचे पालकमंत्री तर लीलावतीला दाखल आहेत असेही त्यांनी सांगितले.

तर निर्णय घ्यावा लागेल

गजानन किर्तीकरांनी ती भूमिका का घेतली ? याबाबत संशय आहे, बोलून दाखवलं नाही तरी त्यांनी मुलाबद्दल ही भूमिका घ्यायला नको. या मताचे आम्ही सारे नेते होतो, मुलाबद्दल त्यांनी भाष्य करायला नको होते, ऊबाठा गटाचा हा गेम त्यांच्या अंगलट आला, घरात भांडणं लावून हा कट आखला. त्यांनी शांत बसणं. हा पर्याय होता, त्यामुळे चर्चेला वाव आहे, समितीकडे हे प्रकरण गेलं आहे, दोन ते तीन दिवसात निर्णय होईल. मुख्यमंत्री अहवाल आल्यानंतर त्यांचा निर्णय घेतील असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. आनंदराव अडसुळ यांनी नवनीत राणा यांच्या लोकसभेतील विजयाबाबत नकारात्मक वक्तव्यं करीत मोठी टीका केली आहे. त्याबद्दल विचारता,’ अडसुळ हे जेष्ठ नेते आहेत, या नेत्यांनी कुठलीही वादग्रस्त वक्तव्य करता कामा नयेत, अन्यथा नाईलाजाने शिंदे यांना सांगावं लागेल की या लोकांना आवर घाला. नाही तर यांचा मार्ग तरी मोकळा करा त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल असेही संजय शिरसाट यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

तिथे आम्हाला काय बाया नाचवायच्या नाहीत …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावर सुनिल राऊत यांनी टीका करीत त्यांना इंग्रजी येतं का ? असा सवाल केला आहे. यावर बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत सुट्टीवर असल्याने सुनिल राऊतवर वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांचा सुट्टी दौरा आहे, तिथून ते मराठवाडा दुष्काळाची पहाणी करतील, यांना डोंबिवलीत जायला वेळ मिळाला नाही, लोकं जळून खाक झालीत आणि हे सुट्टीत मग्न आहेत अशीही टीका शिरसाट यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला इंग्लीश येते की नाही याची काळजी करू नका?, तिथे आम्हाला काय बाया नाचवायच्या नाहीत, फॉरेनच्या अप्सरा तुम्ही गोव्यातील जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये नाचवायचा, मी डोळ्याने पाहिलंय. आम्हाला मायबोली येते आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतो, तुम्हाला इंग्रजीचा अभिमान असेल तर लंडनला शिफ्ट व्हा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. आम्ही फुटू का राहू याची चिंता तुम्ही करू नका , तुमचे आमदार सांभाळा, १२ -१३ जणांना घेऊन गेले असते तर ते अबाधित राहीले असते. बाळासाहेबांनी जे जपलं त्याचा लिलाव तुम्ही केला. याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;