मुक्या जीवांना चिरशांती देण्यासाठी देखील प्रतिक्षा…महानगरातील नवी समस्या

मुक्या जीवांना चिरशांती देण्यासाठी देखील प्रतिक्षा…महानगरातील नवी समस्या

वाढते तणावग्रस्त जीवन आणि नातेसंबंधातील दुरावा यामुळे मानवाला एकटेपणा सतावत आहे. अनेक घरांमध्ये आता एखादा पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढत आहे. आता कुत्र्या आणि मांजरी सारखे प्राणी आता अनेक घरांमध्ये दिसू लागले आहेत. कुत्रा तर मानवाचा आधीपासूनचा मित्र म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी या प्राण्यांना आता कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. अशा मुक्या प्राण्यांना लळा लावला जात आहे. अशावेळी कुत्रे किंवा मांजर पाळताना त्यांचे आयुष्य कमी असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काय करायचे त्यांना कुठे दफन करायचे याचे प्रश्न मुंबई सारख्या मेट्रो शहरात आवासून उभे आहेत. कारण सुमारे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत प्राण्यांसाठी एकही सरकारी स्मशान भूमी नसल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे इलेक्ट्रीक शवदाहीनीत विधी करायचे तर त्यासाठी देखील मोठी प्रतिक्षा यादी असते. एवढंच काय परळचे पशू रुग्णालय वगळता मुंबई आणि परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एकही मोठे रुग्णालय नसल्याने मुक्या जीवांचे हाल होत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;