मुंबईकरांनो बाहेर निघाण्यापूर्वी रेल्वेचे मेगा ब्लॉकचे वेळापत्रक वाचा

मुंबईकरांनो बाहेर निघाण्यापूर्वी रेल्वेचे मेगा ब्लॉकचे वेळापत्रक वाचा

मुंबईत मध्य रेल्वेने आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी २६ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळवण्यात आले आहे. तसेच रेल्वेकडून पावसाळा पूर्वीचे कामेही सुरु करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेत २६ मे रोजी असा बदल

  • सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग
  • सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
  • सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.

डाऊन धीमी मार्गिका:

  • ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटणार आहे.
  • ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कल्याण लोकल दुपारी ३.१८ वाजता सुटणार आहे.

अप धीमी मार्गिका:

  • ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ९.५५ वाजता पोहोचेल.
    ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी ३.२४ वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
  • सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

डाऊन हार्बर मार्गावर बदल

ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल
गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल
ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल
ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल

अप हार्बर मार्गावर बदल

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल
  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

 

पश्चिम रेल्वेत असा बदल

 

बोरिवली -गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० त दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;