Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदारांच्या बोटाला फक्त शाई, बटण दाबणारा एकच, बीडमधील बूथ कॅप्चरचा Video समोर

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदारांच्या बोटाला फक्त शाई, बटण दाबणारा एकच, बीडमधील बूथ कॅप्चरचा Video समोर

परळी तालुक्यात मतदानाच्या दिवशी बूथ कॅप्चरिंगचे आरोप झाल्यानंतर आता शरद पवार गटानं पुरावा म्हणून थेट व्हिडीओचं समोर आणले. हा व्हिडीओ जरा नीट बघा, निळ्या टी शर्ट मधला हा व्यक्ती EVM मशीन जवळ आहे. हाच EVMवरील बटणं दाबतोय. बूथ कशाप्रकारे कॅप्चर करण्यात आलं, हे यातून स्पष्ट दिसतंय. बाजूलाच मतदारांची यादी घेवून बसलेले कर्मचारी आहेत. त्यांच्याच बाजूला हा निळ्या टी शर्टमधला व्यक्ती EVMवरचे बटणं दाबतोय. जे मतदार मतदानासाठी आलेत. त्यांना EVMजवळही येवू दिलं जात नाही. बोटावर शाई लावून त्या संबंधित मतदाराऐवजी हाच व्यक्ती बटणं दाबतोय.

बोटाला शाई लावून जे कोणी मतदार EVMकडे मतदानासाठी पुढे येतोय..त्या मतदाराला हा व्यक्ती परत पाठवून, स्वत:चं बटणं दाबतोय. असे 100 व्हिडीओ निवडणूक आयोगाकडे दिल्याचं शरद पवार गटानं म्हटलंय. त्या व्हिडीओमधला हा 1 मिनिटं 27 सेकंदांचा एक व्हिडीओ आहे. 1 मिनिटं 27 सेकंदांमध्ये तब्बल 5 वेळा या निळ्या टी शर्टमधल्या व्यक्तीनं बटणं दाबलीत. एका व्हिडीओत तर EVM जवळच पंकजा मुंडेंच्या नावाचं पोस्टर आहे. आकाशात उडतो पक्षांचा थवा. बीड जिल्ह्यात नव्हे तर आता दिल्लीत सुद्धा असणार पंकजा ताईंची हवा, असं या पोस्टरवर लिहिलंय.

पाहा व्हिडीओ:-

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. 13 तारखेला बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. मात्र मतदानाआधीच शरद पवार गटानं 7 तारखेलाच निवडणूक आयोगाला शंका उपस्थित करणारं पत्र दिलं होतं. संवेदनशील मतदान केंद्रांची यादी देत, इन कॅमेरा मतदान घ्या, अशी विनंती निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तरी दुर्लक्ष का करण्यात आलं असा सवाल आता शरद पवार गटानं केला. तसंच पुन्हा मतदान घेण्याचीही मागणी केली.

बीड जिल्ह्यातल्या मतदानाचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीही मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी बोगस मतदानाचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते बबन गितेंचा संतापलेला व्हिडीओ रोहित पवारांनी केला होता. बीडमध्ये बोगस मतदान झाल्याच्या आरोपांवरुन ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यात. ज्यात मतदान अधिकारी बूथ ताब्यात घेतल्याचं सांगत आहेत. धनंजय मुंडे आणि काही लोकांमधली कथित ऑडिओ क्लीपही व्हायरल झालीय. शरद पवार गटानं समोर आणलेले व्हिडीओ हा धक्कादायक आहेत. निवडणूक आयोग त्या व्हिडीओ वरुन पुढं काय निर्णय घेतं, हे पाहावं लागेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;