अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, 14 वर्षांनी निकाल

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, 14 वर्षांनी निकाल

मुंबई जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि त्याच्या परिवाराच्या हत्या प्रकरणाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात लैला खान हिच्या सावत्र पिता परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने परवेझ टाकला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी या प्रकरणाचे दुर्मिळातील दुर्मिळ असे वर्णन केले होते आणि दोषी परवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

2011 मध्ये मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात सहा लोक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेक महिने हा प्रकार उघड झाला नव्हता. जुलै 2012 मध्ये पोलिसांना इगतपुरीत फॉर्म हाऊसमध्ये सहा व्यक्तींचे सापळे सापडले. त्यानंतर ऑक्टोंबर 2012 मध्ये लैला खान खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी शकीर हुसैन अजूनही फरार आहे.

14 वर्षांपूर्वी केली हत्या

लैला खान आणि तिच्या कुटुंबाचे खून प्रकरण 14 वर्षे जुने आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या परवेझ टाक याने केली होती, त्यानंतर त्यांचे मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

हत्येनंतर अनेक महिन्यांनी उघड झाला प्रकार

मुंबईतील इगतपुरी येथील बंगल्यातील मालमत्तेवरून परवेझ टाक याचा सेलिनासोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने खून केले. टाक याने सर्वप्रथम त्याची पत्नी सेलिनाची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर त्याने लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली. एकाच कुटुंबातील सहा खून झाल्याची घटना काही महिन्यांनंतर उघडकीस झाली. परवेझ टाक याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली.

सुरुवातीला टाक दावा करत होता की लैला आणि तिचे कुटुंब दुबईत होते. नंतर त्याने महाराष्ट्रातील इगतपुरीत या लोकांची हत्या केल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांना सांगितले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. टाक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये वन कंत्राटदार म्हणून काम केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;