पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येही ‘हिट अँड रन’, अल्पवयीन मुलाने एकाला उडवलं

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमधील झालेला अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. एका बिल्डरच्या मुलाने कोट्यवधींच्या पोर्ष गाडीने बाईकवर चाललेल्या तरूण-तरूणीला उडवत जागेवरच संपवलं होतं. पुण्यातील अपघात चर्चेत असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधुनही ‘हिट अंँड रन’ ची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने एकाला उडवलं असून इरफान शेख नावाच्या 32 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना जे जे मार्ग येथून अटक केली आहे. अल्पवयीन मुलाची डोंगरीच्या बाल सुधारकारागृहात रवानगी करण्यात आलीये. पुण्यातील घटना ताजी असताना मुंबईतून ही बातमी समोर आली आहे.

पोलीस आता अशा प्रकरणाध्ये अल्पवयीन मुलांच्या वडिलांना ताब्यात घेत आहेत. पुण्यात झालेल्या अपघातामध्येही पोलिसांनी विशाल अग्रवाल याला अटक केलीये. वेदांत अग्रवाल याने पुण्यात रविवारी रात्री आपल्या पोर्ष या गाडीने तरूण-तरूणीला धडक दिली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.  सुरूवातीला हे प्रकरण दाबलं गेल्याचे आरोप झाले, मात्र सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल  झाल्यावर हे प्रकरण तापलं.

या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. कारण विरोधकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही या प्रकरणावरून टीका केलेली. मात्र फडणवीसांनी या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार असल्याचं सांगितलं. आता पोलिसांनी विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. तर बार मालकांनाही या प्रकरणामध्ये अटक केली गेली आहे.

दरम्यान,  आरोपी वेदांत अग्रवाल याला 14 दिवस बालसुधार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलीस आरोपींसह इतरांची चौकशी करत आहे. अपघातावेळी गाडीत असलेल्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानंतर कोणाला शिक्षा होते याकडे अवघ्या राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;