Thackeray Family : ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही, बॉलिवूडमध्ये कमावणार नाव
ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पण याच ठाकरे कुटुंबातील एकाने राजकारणाचा वारस सोडून वेगळी वाट पकडली आहे. जाणून घ्या अभिनेता बनणारा पहिला ठाकरे कोण?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही. पण सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांचा राजकीय वारसा मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहे.
उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेने बऱ्याच वर्ष आधी राजकारणात एंट्री केली आहे. पण ठाकरे कुटुंबातील एका मुलाने राजकारणाऐवजी अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. त्याने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याऐवजी क्रिएटिव क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्यने 5 वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलय. चित्रपट बनवण्याबद्दल तो बरच काही शिकलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List