उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?

उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?

महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळं ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं. तर राज ठाकरेंनी जवळपास 17 वर्षांनी धनुष्यबाणाचं बटण दाबलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी, कुटुंबीयांसह आज मतदान केलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत. तर राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिलाय. त्यामुळं मतदान कोणाला केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

मुख्यमंत्री शिंदेचा निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी, काँग्रेसला अभिमानानं मतदान केलं. हा शिवसेनेसाठी काळा दिवस आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंनी वांद्र्यात नवजीवन विद्या मंदिरात मतदान केलं..उद्धव ठाकरेंनी जिथं मतदान केलं. तो मतदार संघ आहे. उत्तर मध्य मुंबईचा. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपकडे अॅड. उज्ज्वल निकम यांच्यात सामना आहे. उद्धव ठाकरेंनी याआधीच आपण काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचा मतदार असल्याचं पत्रकार परिषदेतच सांगितलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजावर मतदान केलं.

17 वर्षांनंतर धनुष्यबाणाला मतदान?

तर दुसरे ठाकरे बंधू राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानाच्या शेजारीच असलेल्या बाल मोहन शाळेत मतदान केलं. 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूनं असलेल्या राज ठाकरेंनी यंदा महायुतीचा प्रचार केला. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी जवळपास 17 वर्षांनंतर धनुष्यबाणाला मतदान केलं आणि त्यावरुन संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला.

राज ठाकरेंनी मतदान केलं त्या दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंमध्ये थेट लढत आहे.

राज ठाकरेंनी चोरीच्या मालाचं चुंबन घेतलं असून डुप्लीकेट धनुष्यबाणाला मतदान केल्याची टीका राऊतांनी केली. संजय राऊत राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडले. महायुतीसाठी प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती..तर मनसेच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते, अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं.

2024ची निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी स्वत:च्याच मतदानाच्या दृष्टीनं नवीन आणि बदल घडवणारी आहे. उद्धव ठाकरेंनी पंजावर मतदान केलं. तर राज ठाकरेंनी धनुष्यबाणाचं बटण दाबलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;