उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदान केल्याशिवाय घरी न जाण्याचं आवाहन केलं आहे. “आज २० तारीख आहे. आपण अशावेळेला भेटतोय की, महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार आहे. मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेत आहे. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा-दहा, बारा-पंधरा मेसेज जात आहेत की, मतदान करा म्हणून. त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत. खूप गर्दी दिसत आहे. पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

“मतदारांमध्ये उत्साह आहे. पण निवडणूक आयोगाचे तथाकथिक प्रतिनिधी हे मतदान केंद्रात बसले आहेत, त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांच्या ठिकाणी नावे दोन ते तीनवेळा तपासले जात आहेत. एकतर ज्येष्ठ मतदारांना आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास झालेला आहे. इतरही मतदारांना त्रास झालाय. यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

‘निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय’, ठाकरेंचा गंभीर आरोप

“मला असं वाटतंय, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;