Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात आज मतदान होत आहे. या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तसेच आज लखनऊमधून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रायबरेलीमधून राहुल गांधी, अमेठीमधून मंत्री स्मृती इराणी, कैसरगंजमधून ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण, मुंबई उत्तर मधून पियुष गोयल निवडणुकीच्या रिंगणात आहे. दिंडोरीमधून मंत्री भारती पवार, बारामुलामधून उमर अब्दुल्ला तर हाजीपूरमधून चिराग पासवानही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List