गँगस्टर अबू सालेमला जीवाची भीती; कारागृहातून हलवू नये यासाठी न्यायालयात याचिका

गँगस्टर अबू सालेमला जीवाची भीती; कारागृहातून हलवू नये यासाठी न्यायालयात याचिका

1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याला जीवाची भीती सतावत आहे. तळोजा कारागृहातून इतर कारागृहात स्थलांतर करण्याच्या बहाण्याने आपले एनकाऊंटर होऊ शकते अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्याने असे स्थलांतर करण्यास परवानगी नाकारण्याची न्यायालयाकडे याचिकेद्वारे विनंती केली आहे. सुनावणीअंती अबू सालेमचे पुढील निर्देशांपर्यंत तळोजा कारागृहातून स्थलांतर करु नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहेत

पोर्तुगालमधून आणले भारतात

  • 19 वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथून सालेमच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते. सालेमची सुटकेची घटीका जवळ आली आहे. त्यामुळे एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात नेताना प्राणघातक हल्ला होण्याची भीती सतावत आहे. तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवू नये,अशी मागणी करणारी याचिका त्याने विशेष न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
  • न्यायालयाने याबाबत तळोजा कारागृहाचे अधीक्षक यांच्याकडे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मे रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील आदेश देईपर्यंत तळोजा कारागृह प्रशासनाने अबू सालेमला दुसऱ्या कारागृहात स्थलांतरित करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोर्तुगाल इथून प्रत्यार्पण झाल्यानंतर अबू सालेमला ऑर्थररोड कारागृहात ठेवण्यात आले होते. मुस्तफा डोसाकडून हल्ला झाल्यावर त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. 19 वर्षांपूर्वी भारतात प्रत्यार्पित केल्यानंतर अबू सालेम तुरुंगातच आहे.

सालेम अंडा सेलमध्ये

1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या अबू सालेमचे पोर्तुगाल येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. ऑर्थररोड कारागृहात डोसाच्या सहकाऱ्याने हल्ला केल्यावर त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र नंतर पुन्हा तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. सध्या त्याचे वास्तव्य तळोजा कारागृहातील अंडा सेल मध्ये आहे. मात्र आता तळोजा कारागृह प्रशासनाने अंडा सेलच्या दुरुस्तीच्या कारणासाठी अबू सालेम ला दुसऱ्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला आहे. तळोजा कारागृह प्रशासनाच्या या निर्णयामुळे अबू सालेम धास्तावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;