‘तुमची शिवसेना नाही, ती तर शिव्या सेना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

‘तुमची शिवसेना नाही, ती तर शिव्या सेना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

महायुतीची मुंबईत आत भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “हिंदू बोलण्यास ही ते कचरत आहे. मोदींबद्दल अपशब्द बोलत आहेत. उबाठाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवल्या. पण सरकार काँग्रेसबरोबर स्थापन केला. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. मोदी म्हणाले, नकली शिवसेना. बरोबर आहे. तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही. बाळासाहेबांचे विचार नाही. शिवसेना नाही, धनुष्यबाण नाही. आमच्याकडे शिवसेना आहे. तुमच्याकडे शिव्या सेना आहे. रोज शिव्या देणं एवढंच आहे. त्यांनी कुणालाही मत द्यावं”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

“बाळासाहेबांचा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघा आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. उबाठा का हात काँग्रेस के साथ. याकूब मेमनचे आणि मुसाचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये दिसत आहे. मुंबईवरील हल्ला आठवा. मुंबईत शेकडो हजारो मुंबईकारांचे बळी गेले. रक्ताचे पाट वाहिले. त्यांच्यासोबत तुम्ही गेला”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“दहा वर्षात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला. नाही झाला. होणारही नाही. मुंबईत काही झालं तरी मोदी घुस के मारेगा हे त्यांना माहीत आहे. मोदींनी पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. पाकिस्तानला माहीत आहे. मोदी आहे तर काहीच करता येणार नाही. मोदी गया तो गुजरात गया असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे मोदी पाहिजे. मोदी गया तो देश गया”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

‘मोदींनी देश सुरक्षित ठेवला’

“देशातील १४० कोटी जनता काय म्हणते, माझं मत मोदींना. कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवला. कारण त्यांनी गरीबांचं कल्याण केलं. त्यांनी भ्रष्टाचारा रोखला. त्यांनी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यात जमा केले. त्यांनी ८० कोटी जनतेला मोफत राशन दिलं. पाच लाखांचा आरोग्य विमा दिला. बेरोजगारांना काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा जपत आहे, बाबासाहेबांचं संविधान जपण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळे देशाला कणखर देशभक्त प्रधानमंत्री पाहिजे. एकीकडे देशभक्ती आहे. दुसरीकडे देशद्रोही विचार करणारे आहेत. त्यामुळे मोदी पाहिजे की… फिर एक बार…मोदी सरकार. आपल्याकडे आहे, महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;