Raj Thackeray : राज ठाकरे यांनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 7 मागण्या, काय घडलं?

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 7 मागण्या, काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एकाच मंचावर भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे सात मागण्या केल्या. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. नरेंद्र मोदी तब्बल 21 वर्षांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभेला आले. याबाबतचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचं आणि केलेल्या कामांचं कौतुक केलं. पण तरीही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे सात मागण्या केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली मागणी ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी, अशी आहे.

राज ठाकरे यांनी मोदींकडे काय-काय मागण्या केल्या?

  • “पहिली अपेक्षा… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. खितपत पडलेला. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल ही अपेक्षा करतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
  • “दुसरी अपेक्षा… देशाच्या अभ्यासक्रमात… देशात मराठा साम्राज्य होतं… त्या मराठा साम्राज्याचा इतिहास मुलांना शालेय शिक्षणात द्यावा. देश कसा उभा राहिला हे कळेल”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली दुसरी मागणी मोदींसमोर मांडली.
  • “तिसरी गोष्ट… समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहील माहीत नाही. शिवाजींचे गडकिल्ले ही खरी स्मारक आहे. या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. पिढ्यांना इतिहास कळावा यासाठी ही समिती असावी”, अशी मागणी राज ठाकरे यानी केली.
  • “चौथी गोष्ट…. देशभरात अनेक ठिकाणी आपण रस्ते उत्तम बनवले, ब्रीज बनवले. १८ आणि १९ला वर्ष मुंबई-गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात आहे. तो लवकरात लवकर व्हावा ही विनंती आहे”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
  • “पाचवी गोष्ट…. तुम्ही तुमच्या सभेत सांगितलं… आज खडसावून सांगा… बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही हे सांगा. तुम्ही लावणार नव्हता. विरोधक जो प्रचार करत आहेत, त्यांची तोंड बंद व्हावीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
  • “सहावी गोष्ट…. या देशात देशभक्त मुसलमान आहे. त्यांची देशावर निष्ठा आहेत. काही मूठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना १० वर्षात डोकंवर काढता आलं नाही. डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहे. त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांना काम करायचे आहे. जे मूठभर आहेत. ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही”, असं राज ठाकरे मोदींसमोर म्हणाले.
  • “सातवी गोष्ट…. रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करता. रेल्वे यंत्रणेंवर बारीक लक्ष द्या. अधिक निधी द्या”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;