Ajit Pawar : विधानसभेला पवार कुटुंबातूनच अजित पवारांना आव्हान देण्याची तयारी, ‘हा’ पवार बारामतीमध्ये ठोकणार तळ, VIDEO

Ajit Pawar : विधानसभेला पवार कुटुंबातूनच अजित पवारांना आव्हान देण्याची तयारी, ‘हा’ पवार बारामतीमध्ये ठोकणार तळ, VIDEO

सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात सगळ्यांच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. इथे पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आहे. सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या कन्या, तर सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी आहेत. बारामतीमधील ही बिग फाईट म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे. बारामतीच्या निकालाने महाराष्ट्रातील भविष्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. काका-पुतण्याच्या या लढाईत बारामतीकर कोणाला कौल देतात? याकडे उभ्या महाराष्ट्रात लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचा गट सत्ताधारी महायुतीचा भाग आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये आहे.

लोकसभेनंतर विधानसभेला सुद्धा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो. विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळू शकतं. त्याची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. अजित पवार यांना विधानसभेला युगेंद्र पवार आव्हान देऊ शकतात. म्हणजे आता जशी अजित पवार यांची त्यांच्या काकांबरोबर लढाई सुरु आहे, तसच विधानसभेला पुतण्याच अजित पवारांना आव्हान देऊ शकतो. युगेंद्र पवार अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांचा पुत्र आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत.

आठवड्यातून किती दिवस बारामतीमध्ये तळ ठोकणार?

युगेंद्र पवार आठवड्याचे चार दिवस बारामतीमध्येच थांबणार असल्याची माहिती आहे. दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. युगेंद्र पवार आधीपासूनच बारामतीमध्ये सामाजित कार्यात सक्रीय आहेत. आता विधानसभेच्या माध्यमातून ते राजकारणात उतरू शकतात. शरद पवार यांचा आणखी एक नातू रोहित पवार आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहे. रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवार आणि रोहित पवार दोघांनी प्रचाराचा मोर्चा संभाळला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;