‘त्या’ दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली

‘त्या’ दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते आपल्यासोबत येतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षाच्या फुटीबाबतची भविष्यवाणी वर्तवली आहे. विशेष म्हणजे यासाठी उद्धव ठाकरेंनी तारीख देखील सांगून टाकली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय घडामोडी या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भवितव्याबद्दल मोठं भाकीत वर्तवलं.

“मला चिंता आहे की, ४ जूनला सरकार जातंय. त्या दिवशी अर्धा भाजप तिथेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. त्यांनी ७५ वर्षाची अट टाकलेली आहे. दोन वर्षांनी मोदी रिटायर होणार. मग भाजपचं काय होईल? एक जमाना असा होता, की अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा ३०२ वरून दोन झाले तर काय करतील भाजपवाले? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल. कारण मोदींचा चेहराही राहिला नाही. सत्ता गेल्यावर त्यांच्याकडे आलेले उंदीर कोणत्या दारात जाणार? कारण आता दारंही राहिली नाहीत. पुन्हा हे गद्दार पक्ष काढणार का?”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘गंगेच्या साफ सफाईचं काय झालं?’

“परवा मोदींनी अर्ज भरला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली. २०१४ मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं असं मोदी म्हणाले. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत? का तिचे अश्रू पाहिले नाही? काही तरी बोलत आहे. गंगेच्या साफ सफाईचं काय झालं? काहीतरी बोलत आहेत. का तुम्हाला दत्तक घेतलं जात आहे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही’, ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

“मिंधे हा या निवडणुकीत विषय होऊ शकत नाही. त्यांची योग्यता नाही. ते फक्त कठपुतली आहेत. आम्ही भाजपसोबतच होतो. २५ ते ३० वर्ष भाजपसोबत होतोच ना. कसे वागले ते? तुम्ही अडीच वर्ष भोगलंत ना सगळं? म्हणून मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;