पाकिस्तानचा झेंडा भाजपच्या मनात फडकतोय; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उद्धव ठाकरेंचा करारा जवाब

पाकिस्तानचा झेंडा भाजपच्या मनात फडकतोय; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उद्धव ठाकरेंचा करारा जवाब

मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवाज शरीफ यांचा पत्ता घ्यायचा आहे. कारण त्यांचे मोदीजी नवाज शरीफांचा वाढदिवसाचा केक न बोलवता खायला गेले होते. मी अडवाणींनाबद्दल काही बोलणार नाही. त्यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यामुळे पाकिस्तानाचा झेंडा यांच्या मनात फडकत आहे. भाजपचा विजय झाल्यावर पाकिस्तान खूश होईल कारण त्यांना वाटेल आया आया अपना मेहमान आया. त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा काढला तर मोदींनी शरीफांचा केक खाल्ल्याने त्यांना केक वॉक मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुस्लिम मतांचं व्होट शिफ्टिंग होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मते मिळताना दिसत आहे. कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जाणाऱ्या शिवसेनेकडे मतं मिळत आहे. केवळ मुस्लिम मतांचं शिफ्टिंग होतंय या दृष्टीकोणातून बघाव लागणार नाही. तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही या दृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे. बाळासाहेबांची शिवसेना मुस्लिमांना चांगली वाटत आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. पण भाजपच्या आणि आमच्या हिंदुत्वात फरक आहे. आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं आहे. तर भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. आमच्याकडे विकास कामांचे मुद्दे आहेत. आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. एखादं संकट येतं तेव्हा धावून जाणारा शिवसैनिक जातपात पाहत नाही, ही आमची ओळख असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आताच्या निवडणुकीत एक नरेटिव्ह, दिशा भाजपला नेता आली नाही. दहा वर्षातील त्यांच्या थापा लोकांना माहीत आहे. दहा वर्ष एकट्या दुकट्याची नव्हे तर सर्वांचीच वाया गेली. ही एक भावना केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर सर्वांच्या मनात आहे. महागाई कुणाला सोडत नाही. बेकारी कुणाला सोडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यात धर्म पाहिला का. ८० कोटी जनतेला मोदी धान्य देतात. त्यात शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत की नाही. जर केवळ हिंदू असतील तर १४० कोटीमधील ८० कोटी हिंदू तुमची सत्ता असताना दारिद्रय रेषेखाली का आहे. वर का गेली नाही. त्यांना नोकऱ्या का मिळाल्या नाही. हे या व्होट शिफ्टिंगच्या मागचं मुख्य कारण असल्याचं ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;