Mumbai hoarding collapse : अंगावर शहारे आणणार होर्डिंग कोसळण्याचा व्हिडिओ आला समोर, क्षणात गेले अनेकांचे जीव

Mumbai hoarding collapse : अंगावर शहारे आणणार होर्डिंग कोसळण्याचा व्हिडिओ आला समोर, क्षणात गेले अनेकांचे जीव

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप १६ जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली. त्याच वेळी या दुर्घटनेचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. केवळ १७ सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य त्या व्हिडिओतून दिसत आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरु राहणार आहे. काही दिवस इतर बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई होत राहणार आहे. परंतु त्यानंतर पुन्हा सर्वसामन्यांना धोकादायक होर्डिंगचा सामना करावा लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २०२२ मध्ये होर्डिंगसंदर्भात धोरण आणले. परंतु त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. होर्डिंगबाबत कायदाच नसल्यामुळे धोरणांचा अंमलबजावणी कायद्याने सक्तीची नाही.

बचाव कार्य पूर्ण झालंय

घाटकोपर दुर्घटनेत NDRF, BPCL, MMRDA, अग्निशमन दल, BMC यंत्रणांचा बचाव कार्यात समावेश होता. या सर्वांनी समन्वय राखून बचावकार्य केल्याची माहिती मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. बचावकार्य पूर्ण झालंय. आता फक्त ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे मदत जाहीर झाली आहे.

मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे काम कालपासून सुरू झाले असल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.
होर्डिंग लावण्याची जी मानांकन ठरवून दिली आहेत, त्या व्यतिरिक्त जर होर्डिंग असतील तर ती हटवली जात आहेत. होर्डिंगच्या मानकांमध्ये त्या होर्डिंगची साईज, त्याचे फाउंडेशन, त्याचा आकार, होर्डिंगमधून पास होणारी हवा, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ही मानके ठरवली आहेत, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेला मानकांचे पालक करण्याचे सांगितले

भूषण गगराणी यांनी रेल्वेला मानकांचे पालन करण्याचे सांगितल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील सूचना आम्ही रेल्वेला दिली आहे. रेल्वेने संबंधित होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला सादर केले पाहिजे. आता मुंबईतील कोणतीही एस्टॅब्लिशमेंटला असेल तर त्याला परवाना घ्यावा लागणार आहे.

पेट्रोल पंपासंदर्भात तपासणी करणार

पेट्रोल पंपला तात्पुरता परवाना दिला होता. पण त्याला पेट्रोल पंप चालवण्याचा परवाना आहे का? हे आता तपासले जाते. जर त्याच्याकडे ते परवाना नसेल तर त्याच्यावर ही कारवाई केली जाणार असल्याचे भूषण गगराणी यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;