मिशन लोकसभा; अखेरच्या टप्प्यात भाजपचे झाडून सर्व मंत्री निवडणुकीच्या मैदानात

मिशन लोकसभा; अखेरच्या टप्प्यात भाजपचे झाडून सर्व मंत्री निवडणुकीच्या मैदानात

लोकसभा निवडणुकीचा किल्ला एक हाती जिंकण्यासाठी भाजपने राज्यात कंबर कसली आहे. गेल्या दोन टप्प्यात दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रात तळ ठोकून होते. आता पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात कसलीही कसर न ठेवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. अखेरच्या टप्प्यात भाजप प्रचारात आक्रमकपणे उतरली आहे. केंद्रातील आणि राज्यातील झाडून सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले आहे.

सभांसह भेटीगाठीवर जोर

भाजपने अखेरच्या टप्प्यात अधिकाधिक मतदार खेचण्यासाठी सभांचा धडाका उडवून दिला आहे. मुंबई आणि परिसरात विविध नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. काही नेते मतदारांच्या भेटीगाठीवर भर देत आहे. काही भागात कोपरा बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. सोशल मीडिया, डिजीटल मीडिया पण दिमतीला आहेच. अखेरच्या टप्प्यात मुंबईत उद्धव ठाकरे गटाला जोर का झटका देण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे.

कुणाची कुठे सभा

  1. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी वडाळ्यात जाहीर सभा
  2. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पालघरच्या सातपाटी व दातिवरे येथे दोन सभांचे नियोजन
  3. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची कांदिवलीत होणार जाहीर सभा
  4. उद्योगपती व व्यवसायिकांसोबत अश्विनी वैष्णव यांच्या मॅरेथॉन बैठका
  5. खार येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार
  6. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान
  7. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिंडोरीसह कुर्ला व मुलुंड येथे घेणार सभा
  8. रामदास आठवले यांची चेंबूर येथे सभा होणार आहे
  9. तर उदय सामंत यांची वडाळा येथे सभा
  10. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सायंकाळी वसईत सभा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे व्यस्त वेळापत्रक

  • राज्यातील लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा आणि बैठका होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघर मध्ये जाहीर सभा आहेत.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त आहेत. नाशिकमध्ये सकाळी 11.45 वाजता गंगापूर रोड नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक – हॉटेल सयाजीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅलीसाठी ते उपस्थिती असतील. त्यानंतर कल्याण ते डोंबिवलीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रथयात्रेत सहभागी होतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;