माझ्या आई-वडिलांना शोधा, घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची आर्तहाक

माझ्या आई-वडिलांना शोधा, घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची आर्तहाक

मयुरेश जाधव, Tv9 प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 52 तास पेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतर अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. मात्र मुंबई विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर मनोज चंसोरिया (वय ६० वर्ष) यांचा अजून देखील पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली शोध सुरूच आहे. मनोज हे मुंबईच्या विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर म्हणून काम करत होते. त्यांचा एकमेव मुलगा हा परदेशात राहतो. मनोज चनसूर्या सोमवारी (13 मे) संध्याकाळी अंधेरी पूर्व मरोळमधून आपल्या मध्यप्रदेशच्या जबलपूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी मुंबईहून निघाले होते. ते टाटा हरिअर लाल कलरची गाडी घेऊन स्वतः चालवत आपल्या पत्नीसोबत जात होते. मनोज घाटकोपरला पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. त्याचवेळी होर्डिंग कोसळले आणि त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा याठिकाणी ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला.

मनोज चंसोरिया यांचा मुलगा काल अमेरिकामधून वडिलांना फोन करत होता. मात्र वडील फोन न उचलल्याने मुलगा हा भयभीत झाला. मुलाने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की, माझ्या वडिलांना काय झाले बघा. वडील फोन उचलत नाहीत. मग मुलाच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली. मग मित्रांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मनोज यांच्या मोबाईलचं लोकेशन तपासणीसाठी पाठवलं. त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले.

मनोज, त्यांची पत्नी अजून देखील ढिगाऱ्याखालीच

पोलिसांनी मनोज यांच्या मुलाच्या मित्रांनाही याबाबत कळवलं. नंतर मनोज यांचे लोकेशन गुगल मॅपवर सर्च करण्यात आलं आणि त्यात बाय वॉक दाखवलं. त्यानंतर पोलिसांना लोकेशन या दुर्घटनामध्ये दाखवल्यानंतर मनोजचा मोबाईल ढिगाऱ्याखालून पोलिसांना मिळाला. मात्र मनोज, त्यांची पत्नी आणि त्यांची गाडी अजून देखील ढिगाऱ्याखालीच आहे. मनोज यांचा मुलगा अमेरिकामधून सातत्याने आईच्या मोबाईलवर फोन करत आहे. मात्र आईचा फोन लागत आहे. तो उचलला जात नाहीय. आई-वडील दोन्हीही फोनवर रिस्पॉन्स देत नसल्याने मुलगा हा भयभीत झालाय. मुलाचे मित्र आणि कुटूंब हे सर्व जण घटनास्थळी दाखल झाले असून मनोज आणि त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;