मोदींच्या ‘त्या’ प्रश्नावर अखेर उद्धव ठाकरे यांचं जोरदार उत्तर; म्हणाले, तुमच्यासोबत राहून…

मोदींच्या ‘त्या’ प्रश्नावर अखेर उद्धव ठाकरे यांचं जोरदार उत्तर; म्हणाले, तुमच्यासोबत राहून…

नकली सेना निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर उत्तर दिलं आगहे. गेली 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तुमच्याकडून दगाफटका खाऊनही आम्ही तुमच्यासोबत राहिलो. तरीही आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? असा सवाल करतानाच जोपर्यंत हे समोर बसलेले शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मला चिंता नाही. तुम्ही भाजपची चिंता करा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदीजी तुम्ही 4 जूननंतर पंतप्रओधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा पीएम केअर फंडचं काय करणार आहात? कुणाच्या हातात तो देणार आहात? तेही सांगून टाका, असं सांगतानाच तुम्ही पंतप्रधान होत नाही. मला भाजपची चिंता वाटते. कारण दोन वर्षानंतर तुम्ही झोळी लटकवून निघून जाल. तेव्हा भाजपची अवस्था काय होईल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

राजकीय क्षितीजावर दिसला नसता

वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले. फक्त बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही वाचलात. बाळासाहेबांनी हस्तक्षेप केला नसता तर तुम्ही राजकीय क्षितीजावर राहिला नसता. आज तुम्ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाचे हे पांग फेडले? काय वाटत असेल वाजपेयींना, असा खोचक हल्ला त्यांनी चढवला.

उंदरांच्या शेपट्या…

विरोधकांकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, अशी टीका आमच्यावर करता. आमच्याकडे चेहरे आहेत. तुमच्याकडे तर चेहराच नाही. दोन वर्षानंतर तुमची अवस्था काय होईल ते पाहा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजप फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जे उंदीर तुमच्याकडे पळाले त्यांच्या शेपट्या कशा पकडतो ते पाहा, असा इशाराच त्यांनी दिला.

नाशिकमध्ये या, सुफडा साफ होईल

गेल्या निवडणुकीत मोदींनी 200च्या वर सभा घेतल्या. जिथे गेले तिथे भाजपचा सुपडा साफ झाला. तुम्ही नाशिकमध्ये या. म्हणजे भाजपचा सुपडा साफ होईल. महाराष्ट्राने तुम्हाला 40च्यावर खासदार दिले. तुमच्यावर उपकार केले. त्याची फेड अपकाराने करता? तुम्ही आज मतांची भीक मागत आहात. दहा वर्ष महाराष्ट्राला आणि जनतेला फसवलं. आता महाराष्ट्र फसणार नाही, असं ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;