PM नरेंद्र मोदींच भाषण सुरु असताना भर सभेतून मुख्यमंत्री शिंदे का उठून गेले?

PM नरेंद्र मोदींच भाषण सुरु असताना भर सभेतून मुख्यमंत्री शिंदे का उठून गेले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दोऱ्यावर आहेत. नाशिकमधील सभा आटोपल्यानंतर मोदी यांची मुंबईतील कल्याणमध्ये सभा झाली. या सभेमध्ये बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांचं भाषण संपण्याआधीच निघून गेले. मी इथे पाहतो तुम्ही पुढे जा, असं मोदी एकनाथ शिंदे यांना म्हणाले. मात्र नेमकं काय घडलं आणि एकनाथ शिंदे कुठे गेले जाणून घ्या.

…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठून गेले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा असून त्यांची नाशिक आणि कल्याणमध्ये सभा होणार होती. त्यानंतर मुंबईमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा रोड शो होणार आहे. नाशिकमधील सभा आटपून मोदी कल्याणमध्ये आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झाल्यावर पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. भाषण सुरू असताना शिंदे उठले आणि स्टेज सोडून जाऊ लागले. नेमकं काय झालं कोणालाच काही समजलं नाही, त्यानंतर मोदींनीच सांगितलं.

काय म्हणाले मोदी?

मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये मला जायचं आहे. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येणार आहेत. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी शिंदे यांना मध्यातूनच निघावं लागणार आहे, असं सांगत तुम्ही जा मी इथे सांभाळतो असं मोदी शिंदे यांना म्हणाले. त्यावेळी मोदीsss मोदी अशा घोषणा दिल्या. मोदींचा आज मुंबईत रोड शो होणार असल्यामुळे आर्थिक राजधानीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी काँग्रेसवर बरसले

जे लोक ज्यांनी पिढ्या न पिढ्या गरिबी हटाव खोटे नारे दिली आणि प्रत्येक निवडणुकीत अफिम गोळीचा हार, नेहरूंपासून 2014 निवडणुकी पर्यंत गरिबीचा आफिम माळ जपायचे. हाच यांचा खेळ चालायचं. ज्यांनी भ्रष्टचार शिष्टाचार बनवला होता. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासाच्या बजेट मध्ये छेद दिला, फाळणी विचार केला. बजेट हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट हा विचार त्यांनी केला. काँग्रेस 15 टक्के बजेट मुसलमानांसाठी मंजूर करावे अशी त्यांची इच्छा. हिंदू बजेट मुस्लिम बजेट देशाचे भले करणार का? हे पाप काँग्रेस पक्ष करत होता. त्यावेळी आपण गुजरात मुख्यमंत्री आपण सर्वात आधी विरोध केल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;