मतदानाच्या दिवशी दोन कर्मचारी आणि एका जवानाचा मृत्यू, तिघेही धुळे-जळगावचे

मतदानाच्या दिवशी दोन कर्मचारी आणि एका जवानाचा मृत्यू, तिघेही धुळे-जळगावचे

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदानावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्रासह देशभरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचं काम चोखपणे बजावलं होतं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत. तर एका जवानाचाही मृत्यू झाला असून तो धुळ्याचा आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असताना एकूण तीन जणांना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 58.47 टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28 टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या मतदानाच्या तयारी दरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आर्थिक मदत देणार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला. यावेळी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या तयारी दरम्यान नियुक्त महापालिकेचा क्लार्क आणि होमगार्ड अशा दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मयत कर्मचाऱ्यांना शासनाची भरपाई मिळावी या संदर्भात अहवाल पाठवण्यात येणार असल्याच यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

धुळ्यातील जवानाचा मृत्यू

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच शेरगाव (अरुणाचल प्रदेश) येथील 73 बटालियन सशस्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आलं. कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे (ता. शिंदखेडा) येथील हा जवान होता. काल 14 मे रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला. कमलेश हे कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे निवडणूक बंदोबस्तावर होते. कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पाच दिवसात बातमी आली

कमलेश यास वीरमरण आल्याची बातमी काल सायंकाळी येथे पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. नुकतेच ते धुळ्यात आले होते. आठवड्याभोरा पूर्वी ते ड्युटीवर गेले होते. मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी आणि दोन जुळे मुल आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;