Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के

Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईतील सहा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदार संघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचवेळी ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली? कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत? याचा अहवाल तयार केला आहे. ‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

सर्वाधिक संपत्ती कोणाची वाढली

पीयूष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५४.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटीं संपत्ती आहे.

सर्वाधिक संपत्ती खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे. त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग ६६९ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ ६१९ टक्के राहिली. काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती ४८३ टक्के वाढली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ ३.५ टक्के आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे. वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खून, खंडणी, धमकाविणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या यादीत वंचित बहुजन आघाडी प्रथम क्रमांकावर आहे. समता पक्ष द्वितीय तर रिपब्लिकन बहुजन सेना तिसऱ्या स्थानावर आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;