धोका वाढला, घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग, मृतांची संख्या वाढली

धोका वाढला, घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग, मृतांची संख्या वाढली

मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना घडल्याच्या ४० तासांनंतर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली आहे. बुधवारी सकाळी आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप होती. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून आज सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. त्यांची नावे अजून समजलेली नाहीत. यामुळे मृतांचा १८ वर जाण्याची शक्यता आहे. राजावाडी रुग्णालयातील प्रकाश वाणी यांनी ही माहिती दिली.

अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला आता ४० तास झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकले आहेत. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे.  पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. परंतु बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. मोठे लोखंड कटरने कापात असताना  आग लागली. आगीची घटना घडताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली. या ठिकाणी त्वरित अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्याचे काम सुरु आहे.

65 जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्याचे काम

आगीनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील लोकांनाही हटवण्यात आला आहे. पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीमुळे ही काळजी घेण्यात आली आहे. 65 अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्यासाठी काम करत आहेत. मलब्याखाली दबलेल्या वाहनांना काढण्यात आले आहे. आणखी काही वाहने दबल्याचा अंदाज आहे. ते काढण्याच काम सुरु आहे. आतापर्यंत 89 जणांना रेस्कीयू करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;