घ्या दोनशे, बोला मनसे… अशा भूमिका नव्हत्या; सुषमा अंधारे यांचा पुन्हा हल्लाबोल

घ्या दोनशे, बोला मनसे… अशा भूमिका नव्हत्या; सुषमा अंधारे यांचा पुन्हा हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ दाखवला. बाळासाहेबांवर टीका करणारी बाई तुमच्या पक्षाच्या प्रवक्तेपदी कश्या? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना मानतात का? तुमच्या निष्ठा घ्या 200 बोला मनसे असं अशी आहे का? तुम्ही माझा व्हिडीओ दाखवता, तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते. त्यामुळे घ्या दोनशे, बोला मनसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या, असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवला आहे.

सुषमा अंधारे काल मुंबईतील एका प्रचार रॅलीला संबोधित करत होत्या. त्यावेळी त्यांनी हा हल्ला चढवला. मला माझ्याकडेवर माझी पोरं खेळवायची आहेत असं राज ठाकरे म्हणाले होते. तुमची पोरं कोण कोण खेळतो ते बघा. वसंत मोरे, प्रवीण दरेकर ते बघा. अन् यांनी नितेश राणे आणि निलेश राणेंना कडेवर घेतलं. कणकवलीत तुम्ही नारायण राणे यांच्या प्रचाराला का गेलात? राणे बाळासाहेबांबद्दल काय बोलायचे ते विसरलात का? घ्या दोनशे, बोला मनसे अशी तुमची अवस्था झाली आहे. बाळासाहेबांबद्दल निलेश राणे काय बोला ते ऐका. त्यांच्या बापाच्या प्रचारासाठी तुम्ही गेलात, ते काय म्हणाले ते कधी ऐकलंय का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

निगेटिव्ह थॉट प्रोसेस राजा

सध्या उठ दुपारी घे सुपारीचं राजकारण सुरू आहे. सुपारीबाज काहीतरी नवे मुद्दे घ्या. 27 वर्षापूर्वीचा एक चंक होता. तो आता दाखवत आहेत. हीच ती माणसं भाऊ मृत्यू शय्यवर असताना नक्कल करायची. अजित पवारांवर काहीही बोलायचे. आता त्यांचे गुणगाण गात आहेत. कोणत्याही मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्या नाहीत. राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेस राजा आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. मी नागवंशी आहे. माझ्या नादाला लागू नका. मला बाई समजून हलक्यात घ्यायची नाही, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना दिला.

उठ दुपारी, घे सुपारी

नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडगोळी राजकारणातून बाद झाली पाहिजे, असं हेच राज ठाकरे म्हणायचे. इतका खोटं बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही, असं राज ठाकरे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस यांनी तर राज ठाकरे यांची अब्रुच काढलेली आहे. तरीही राज ठाकरे हे भाजपसोबत गेले. यालाच उठ दुपारी आणि घे सुपारी म्हणतात, असा हल्लाही त्यांनी चढवला.

पत्रकार परिषदा का घेत नाहीत

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. राज्यात उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार आहे. काही लोक आता जाणीवपूर्व वाद निर्माण करत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारल्यावर यांच्याकडे उत्तर नसतं. मोदींची 56 इंचाची छाती मीडियासमोर का जात नाही? मोदी पत्रकार परिषद का घेत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मोदींना पीसी घ्यायला सांगावं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;