Sanjay Raut : तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो… संजय राऊत यांची कुणावर खोचक टीका

Sanjay Raut : तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो… संजय राऊत यांची कुणावर खोचक टीका

लोकसभा निवडणूक 2024 ही आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. राजकीय नेत्यांच्या जीभेला त्यामुळे धार चढत आहे. हातघाईच्या या लढाईत बुरुजू ढासळू तर द्यायचा नाही. उलट समोरील बुरुजावर तोफगोळे डागायची कोण घाई राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो, असा भीमटोला त्यांनी हाणला. त्यांचा रोख कुणावर होते, हे आजच्या घडामोडींवरुन तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल नाही का?

पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. नामनिर्देशन पत्र भरताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. दिग्गज नेते यावेळी उपस्थित असतील. विविध राज्यातील मुख्यमंत्री, दिग्गज पदाधिकारी हे वाराणशीत, काशीत डेरेदाखल झाले आहेत. पंतप्रधान कालभैरवांचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरतील.

हा तर त्यांचा निरोप समारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा अशी लोक उपस्थित राहतात. त्यांचीही निरोपाची यात्रा आहे,त्या यात्रेत त्यांची लोकं उपस्थित राहणार हे त्यांचे फेअरवेल आहे,फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी असला तर राजकीय दृष्ट्या चांगला मोक्ष मिळतो.”, असा भीमटोला त्यांनी हाणला.

वाराणशीत विजयासाठी झगडावं लागणार

“आम्ही वारंवार सांगतो आहोत, मोदी तो गीयो, मोदींना वाराणसी मध्ये सुद्धा विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती आहे. मोदींचं दैवत व संतत्व संपलेलं आहे. यापुढे नरेंद्र मोदी अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल. बहुमत काय तर साधं बहुमत जरी मिळालं तरी पुरे झालं. भाजप 200 च्या वरच जात नाही. त्यांचे मित्र पक्षांची गाडी देखील 200 वर अडकतील.” असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे शाब्दिक वॉर पुन्हा एकदा भडकले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;