घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना, पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, 100 पेक्षा जास्त जण अडकले

घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना, पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, 100 पेक्षा जास्त जण अडकले

मुंबई कोणतं संकट कधी कसं येऊन धडकेल याचा काहीच भरोसा नाही. मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत ऊन आणि मोकळं आभाळ असलेलं वातावरण होतं. पण अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. या वाऱ्याचा वेळ तासी 40 ते 50 किमी असा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मुंबईतील दोन ठिकाणी तर मोठमोठ्या होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. आधी वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना आहे. या घटनेत कुणी जखमी झालं आहे का, कितपत नुकसान झालंय, याबाबतची सविस्तर मााहिती अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेनंतर घाटकोपमध्येदेखील अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग हे पेट्रोल पंपावर कोसळलं.

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या घटना खूप मोठी आहे. कारण पाऊस आणि वादळी वारा यामुळे अनेकांनी पेट्रोल पंपाच्या छताखाली जाण्याचा विचार केला. त्यामुळे अनेकजण स्वत:ला पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी पेट्रोल पंपाच्या छताखाली गेले होते. तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर आल्या होत्या. या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेलं भलंमोठं होर्डिंग हे थेट पेट्रोल पंपावर कोसळलं. यामुळे मोठा हाहा:कार उडाला. घाटकोपरमधील छेडानगर परिसरात ही घटना घडली. घटना घडताच मोठी तारांबळ उडाली. अनेकांनी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. घटनेचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाचरण करण्यात आलं आहे.

आतापर्यंत 35 जखमी रुग्णालयात दाखल

पोलिसांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु झाले. या पेट्रोल पंपावर जवळपास 100 पेक्षा जास्त जण अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाने आतापर्यंत अनेक जणांना रेस्क्यू करुन बाहेर काढलं आहे. जखमींना तातडीने एसएमटी भारती, एमएस, आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;